शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू : स्मिता देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:47 IST

Politics Ncp Bjp Sataera : गोपीचंद पडळकर यांच्या बलगबच्च्यांनी राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना फोनवरून अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. या प्रकाराने राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या वाघिणी आहोत. पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू, असा इशारा राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देपडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू : स्मिता देशमुखराष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांचा इशारा

सातारा : गोपीचंद पडळकर यांच्या बलगबच्च्यांनी राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना फोनवरून अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. या प्रकाराने राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या वाघिणी आहोत. पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू, असा इशारा राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.देशमुख म्हणाल्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला लढण्याची ताकद दिली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे सर्वसामान्य महिला सुरक्षित आहेत. आमचे सरकार, पोलीस यंत्रणा आमच्यासोबत आहे.

पडळकरांचे बगलबच्चे घाणेरड्या भाषेत बोलतात, आम्ही राष्ट्रवादीच्या वाघिणी आहोत. पक्षाने आम्हाला तेवढी ताकद दिली आहे. धमक्यांमुळे आम्ही घाबरून बसणार नाही. पडळकर हे केवळ प्रसिद्धीसाठी साहेबांविषयी बोलतात. मात्र त्यांच्या बगलबच्च्यांनी सुरू केलेला प्रकार तत्काळ थांबवावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला, युवती पेटून उठतील, महिलांवरील अशी अत्याचाराची भाषा खपवून घेणार नाही.पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी फालतुगिरी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांवरील घाणेरडी टीका थांबवा अन्यथा घरात घुसून मारू. महिलांना राजकारणात पुढे जाण्यासाठी आरक्षण मिळाले आहे. कुठेही अन्याय, अत्याचार होत असेल तर त्याचा विरोध करण्याची आमची तयारी आहे. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार थांबवावा, असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसरBJPभाजपा