शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढूया, रणजितसिंह देशमुख यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:10 IST

शेखर जाधव  वडूज : खटाव तालुका हा क्रांतीकारकांचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला ...

शेखर जाधव वडूज : खटाव तालुका हा क्रांतीकारकांचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी 'हातसे हात जोडो' अभियानाच्या माध्यमातून  काँग्रेसचे विचार गावा-गावांत पोहचवणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी केले.येथील फिनीक्स ऑर्गनायझेशन सभागृहात काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते राजूभाई मुलाणी, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, डॉ.महेश गुरव, सत्यवान कमाने, पांडूरंग खाडे, आनंदा साठे, राहुल सजगणे आदीची उपस्थिती होती.यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असून गाव तेथे शाखा उभारून काँग्रस विचारसरणीची पाळेमुळे घट्ट करणार आहे. भारत जोडो यात्रेतील सभेमुळे मोदी सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळे खोटे आरोप करत खासदार राहूल गांधी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे म्हणाले.राष्ट्रीय कॉग्रेस माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव म्हणाले की, खटाव - माण तालुक्यात सध्या झळकणारे, विकासकामांचे कोटींची उड्डाने घेणारे,  प्रसिद्धीचे माँडर्न सिटीसारखे फ्लेक्स बोर्ड यापूर्वी देखील पाहिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी  मंजूर केलेली कामेही या चमकोगिरी भाजपच्या आमदारांनी प्लेक्स बोर्डवर आणून त्यांचे ही श्रेय लाटले. त्यामुळे यापुढील काळात नौटंकी करणाऱ्या आमदाराची डाळ येथील जनता शिजू देणार नाही. तालुकाघ्यक्ष संतोष गोडसे यांनी तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर लवकरच जनआंदालने उभारणार असल्याचे सांगितले.        सत्यवान कमाने यांनी प्रास्तावीक, विजय शिंदे यांनी सुत्रसंचालन तर युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी सरपंच सदाशिव खाडे, जोतिराम बागल, आकाराम खाडे, परेश जाधव, राजेंद्र माने, निलेश घार्गे, सयाजी सुर्वे, राम कुलकर्णी आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपा