शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

corona virus-मुलांबरोबरच कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 5:07 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरात कोंडून घातलेल्या मुलांबरोबरच गुगलगिरी करणाऱ्या पालकांच्याही कल्पकतेला वाव देण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली आहे. कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पध्दतीने घडविण्याचा प्रयत्न या संकटातून बाहेर पडताना पालकांनी करणं गरजेचं आहे.

ठळक मुद्देमुलांबरोबरच आपल्यातील कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत  संकटातही संरचनात्मक उत्तर शोधण्याची गरज

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरात कोंडून घातलेल्या मुलांबरोबरच गुगलगिरी करणाऱ्या पालकांच्याही कल्पकतेला वाव देण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली आहे. कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पध्दतीने घडविण्याचा प्रयत्न या संकटातून बाहेर पडताना पालकांनी करणं गरजेचं आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सेट झालेल्या रूटीनच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका पालकांना बसला आहे. दिवसभर क्लास आणि शाळा अशा व्यस्त दिनचर्येत अडकलेली लेकरं आता मोकाट झाली आहेत. परिक्षेच्या तोंडावर सुट्टी मिळाल्याने त्यांना अभ्यास करण्याची इच्छाच होईना आणि पालकांना नेमकं हेच सोसेना अशी स्थिती घराघरांत दिसत आहे.

विशेष म्हणजे शाळा, क्लास आणि खेळ यात व्यस्त असलेल्या मुली पालकांना सलग आठ ते दहा तास कधी भेटतच नव्हती. आता कुठंही बाहेर जाण्याची सोय नसल्यामुळे लेकरांबरोबर पूर्णवेळ थांबायची वेळ पालकांवर आली आहे. याची सवय नसल्याने घरात वातावरणही तंग होत आहे.पालकांनी हे करावेच

  • मुलांकडून प्रत्येक विषयाचा दररोज सराव करून घ्या,
  • प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका सराव, लेखन, वाचन यांचा सराव घ्या.
  • खेळांतून द्या महत्वपूर्ण धडे
  • पालकांनी घरात मुलांबरोबर गॅझेट फ्री वातावरणात राहण्याच प्रयत्न करावा.
  • काचा कवड्यांसारखे अनेक बैठे खेळ मुलांशी संवाद साधत खेळणं हा एक उत्तम पर्याय आहे.
  • याबरोबरच त्यांना नकाशा वाचण्याची, गावाचा इतिहास सांगण्याची, भूगोल दाखविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत.
  • घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांची मदत घेवून त्यांच्या सहाकार्याने घर आवरण्याची ही संकल्पना मुलांना स्वयंशिस्तीच्या निकषांवर उपयुक्त ठरतात.

शाळेच्या संपर्काचा पर्यायफोन, वॉट्सअ‍ॅप, मेसेज या माध्यमातून आपल्या पाल्याच्या शिक्षकांच्या संपर्कात राहा. शाळेला सुट्टी असली तरीही शिक्षकांना आॅनलाईन मार्गदर्शन करण्याचे बंधनकारक आले. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, होमवर्क देतील. कोणत्याही कारणांनी मुलांच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका... आपल्या शंका ,अडचणी नक्की विचारा,हे टाळा..!मुलांना अनोळखी व्यक्तींच्या, परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात जाऊ देऊ नका. बाहेरील वस्तू खाऊ देऊ नका, उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम, बर्फ गोळा, आईस कांडी, पाणीपुरी,भेळ अशा वस्तूंपासून चार हात दूर ठेवा. याबरोबरच मुलांना सुट्टी लागली म्हणून गावाला पाठवू नका, त्यांना पिकनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, सहल इत्यादी ठिकाणी जाणं धोक्याचं ठरू शकतं. सुट्टी आहे म्हणून त्यांना बाजार, यात्रा महोत्सव, आदी ठिकाणी पाठवू नका.पाळणाघरही बंदचकोरोनाचा संसर्ग लगेच होत असल्याच्या धास्तीमुळे शहरातील बहुतांश पाळणाघरही बंद ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी पालकच मुलांना पाठवत नाहीत, तर काही पाळणाघर शासनाच्या कारवाईच्या भितीनेच बंद ठेवण्यात आली आहेत.

संकटातून मार्ग शोधण्याची उत्तम संधी पालक म्हणून अनेकांसमोर आली आहे. गुगलगिरी बंद करून विचार करण्याची प्रक्रिया आणि त्यातुन निर्माण होणारी कल्पकता प्रदर्शित करण्यासाठी मिळालेल्या या सुट्टीचा पालकांनी पाल्यासोबत आस्वाद घ्यावा.- डॉ. राजश्री देशपांडे,मनोविकारतज्ज्ञ, सातारा

माझ्या दोन्ही मुली आजी-आजोबा आणि अत्या यांच्यासोबत दिवसभर घरीच असतात. रोज टिव्ही किंवा गॅझेट बघण्यापेक्षा मी त्यांच्यासाठी ब्रेन गेम आणल्यात त्यात त्यांचा बराच वेळ जातोय. रात्री घरी परतल्यावर त्यांनी दिवसभर केलेल्या कृतींचा मी आढावा घेते.- राणी मुथा-शहा,सीए, सातारा

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर