निंभोरे गावात आढळला मृतावस्थेत बिबट्या; परिसरातील नागरिकांच्यात घबराट पसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:24 IST2025-01-26T18:23:06+5:302025-01-26T18:24:27+5:30
फलटण तालुक्यात निंबलक , मुंजवडी ,गिरवी या परिसरात बिबट्या दिसल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती.

निंभोरे गावात आढळला मृतावस्थेत बिबट्या; परिसरातील नागरिकांच्यात घबराट पसरली
फलटण : निंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीत पुणे- पंढरपूर पालखी महामार्गलगत गव्हाच्या रानात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. निंभोरे गावालगत असणाऱ्या अष्टविनायक हॉटेलच्या समोरील बाजूस गव्हाच्या शेतात आज दुपारी हा बिबट्या काही नागरिकांना मृता अवस्थेत दिसला. त्यांनी ही बाब फलटण वनविभागाला कळवली. वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे याचा तपास करीत आहेत.
फलटण तालुक्यात निंबलक , मुंजवडी ,गिरवी या परिसरात बिबट्या दिसल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. अनेकवेळा वन विभागाच्या कॅमेरात देखील बिबट्या कैद झाला होता. मात्र पुणे -पंढरपूर सारख्या इतक्या रहदारीच्या परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांच्यात घबराट पसरली असून बिबट्याचे वास्तव्य या भागात असेल तर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वन विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.