साताऱ्यात वनकर्मचाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडताना घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:43 IST2025-01-22T11:43:29+5:302025-01-22T11:43:51+5:30
सातारा : खिंडवाडीलगत असलेल्या उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्याात ...

साताऱ्यात वनकर्मचाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडताना घडली घटना
सातारा : खिंडवाडीलगत असलेल्या उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्याात वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण हे जखमी झाले. त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमी बिबट्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. यानंतर वनविभागाचे पथक मंगळवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास उंटाचा डोंगर परिसरात दाखल झाले. पथकाने टाकलेल्या जाळीत बिबट्या सापडला नाही. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने निवृत्ती चव्हाण यांच्या अंगावर उडी मारून त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीमध्ये त्यांच्या अंगाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
तसेच वनरक्षक सुहास काकडे, महेश अडागळे, सचिन कांबळे, मयूर अडागळे हेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी बिबट्याला जेरबंद करण्यात आले असून, उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.