शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिवे, जनसेटवरून वाद

By admin | Updated: November 7, 2015 23:40 IST

सातारा पालिका सभा : ४१ पैकी ४० विषयांना मंजुरी

सातारा : सातारा पालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर शनिवारी पहिलीच सभा झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील ४१ पैकी ४० विषयांना मंजुरी देण्यात आली तर एक विषय पुढील सभेवेळी पुन्हा मांडण्याचा निर्णय झाला. नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहरातील बसविण्यात येणाऱ्या एलईडी दिवे आणि शाहू कला मंदिरातील जनसेटच्या निविदावरून सभा वादळी ठरली.शाहू कला मंदिरातील जनसेटची निविदा मंजूर करण्यात आली तर एलईडी दिव्यांचा विषय पुढील सभेवेळी पुन्हा मांडण्याचा निर्णय झाला. विरोधी पक्षनेते अ‍ॅड.बाळासाहेब बाबर यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाची कानउघडणी केली तर नगरसेवक रवींद्र पवार आणि प्रवीण पाटील यांच्यात काही मुद्द्यांवर कलगीतुरा रंगला. वीज वापरामध्ये बचत करण्यासंबंधी आलेल्या निविदांबाबत चर्चा झाली. यावर अ‍ॅड. बाबर यांनी ‘हा अहवाल परिपूर्ण नाही. शहरात लाईटचे खांब किती, त्यावरील दिवे किती याबाबत कोणतेही आॅडिट नाही. एलईडीच्या फायदे- तोट्याचा अभ्यास नाही. ज्यांनी निविदा भरली आहे, त्यांनी यापूर्वी कुठे असे काम केले आहे का? त्याचा अहवाल नाही. त्याचबरोबर आता जे दिवे बदलण्यात येणार आहेत. त्याचे पुढे काय करणार,’ असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करण्यात आले.उपनगराध्यक्ष जयवंत भोसले म्हणाले, ‘बाळासाहेब बाबर यांनी मांडलेले मुद्दे पडताळून पाहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी) निविदा मंजुरीवरून वादशाहू कला मंदिरासाठी जनरेटर खरेदी व बसविण्याबाबत आलेल्या निविदा मंजुरीवरून नगरसेवक प्रवीण पाटील, रवींद्र पवार, अ‍ॅड.बाळासाहेब बाबर यांच्यात वादविवाद झाला. यात माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेविका हेमांगी जोशी, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, अ‍ॅड. डी.जी. बनकर यांनीही भाग घेतला. प्रवीण पाटील म्हणाले, ‘शाहू कला मंदिरातील त्रुटीबाबत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या टीकेपैकी ८० टक्के वास्तव आहे. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांनी शाहू कला मंदिराची पाहणी करून त्रुटी दूर कराव्यात.