कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:06+5:302021-06-22T04:26:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तरडगाव : कृषी योजनाविषयक सर्व आवश्यक माहिती शेतकऱ्यांना देऊन त्या अंतर्गत उत्तम दर्जाची खत बियाणे त्यांना ...

Launch of agricultural revival campaigns | कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ

कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

तरडगाव : कृषी योजनाविषयक सर्व आवश्यक माहिती शेतकऱ्यांना देऊन त्या अंतर्गत उत्तम दर्जाची खत बियाणे त्यांना द्यावीत. ही कृषी संजीवनी मोहीम संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने राबवावी, अशा सूचना देत शेतकऱ्यांनी देखील त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

फलटण तालुक्यात २१ जून ते १ जुलैदरम्यान शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. नुकताच या योजनेचा प्रारंभ रावडी बुद्रुक येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सत्यजितराजे नाईक निंबाळकर, भगवानराव होळकर उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहेे. यासाठी २५ शेतकऱ्यांचा गट तयार करावयाचा आहे. गटशेती पद्धतीनुसार त्यांना यामध्ये भाग घेता येणार असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रदीप शिंदे यांच्या शेतात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी खरीपपूर्व तयारी, बांधावर खत वाटप, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे यासह कृषी योजना विषयक योजनांची माहिती देण्यात आली.

या वेळी प्रकल्प संचालक विनयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, कृषी सहायक देवराव मदने, टी. एस. कुंभार, ए. एस. नाळे, डी. व्ही. पोरे, शरद खुडे, दादा अडसूळ, अमित रणवरे, आबा नाळे, जगन्नाथ सूळ, अनिल बोबडे, रामभाऊ कदम, सतीश झारगे, बापूराव करचे, सुहास भोसले उपस्थित होते.

फोटो -फलटण तालुक्यातील रावडी बुद्रुक येथे शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी बी बी एफ यंत्राद्वारे युवा नेते सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी बाजरी पेरणी केली. या वेळी आमदार दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सचिन गायकवाड तरडगाव

Web Title: Launch of agricultural revival campaigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.