कराड : गृहकर्जाचा बोजा मालमत्तापत्रकी नोंद करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना कराड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली आहे.कुंडलिक खंडू मोडक (वय ३८, सध्या रा. रालनंदिनी रेसिडन्सी, हॉल कॉलनीचे मागे, ता. कराड, मूळ रा. मु. पो. खटकाळे, ता. जुन्नर, जि. पुणे), असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्याच्या गृहकर्जाचा बोजा मालमत्तापत्रकी नोंद करण्यासाठी कराड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी कुंडलिक मोडक याची भेट घेतली असता तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी कुंडलिक मोडक याने सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचला. दरम्यान, मंगळवार, दि. ३ रोजी पडताळणी कारवाईदरम्यान पंचासमक्ष कुंडलिक मोडक याने ७ हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता व लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी कुंडलिक खंडू मोडक याच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने केली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
Web Summary : A land surveyor in Karad was arrested by the Anti-Corruption Bureau for accepting a ₹7,000 bribe to register a home loan. This marks the second consecutive day of such action in Karad.
Web Summary : कराड में एक भू-मापक को गृह ऋण दर्ज करने के लिए ₹7,000 की रिश्वत लेते हुए भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने गिरफ्तार किया। कराड में लगातार दूसरे दिन ऐसी कार्रवाई हुई है।