शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ओढा बंदिस्त करणाऱ्यांचे पितळ उघडे!

By admin | Updated: July 21, 2015 00:39 IST

गुन्हा दाखल होणार : पालिका प्रशासनाची कारवाई

सातारा : सदर बझार येथे ओढा पाईपलाइनद्वारे बंदिस्त करण्याचे सुरू असलेले काम पालिका प्रशासनाने थांबविले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाला दिले. सोमवारी तहसीलदार राजेश चव्हाण यांना सदर बझार येथील ब्रिटिशकालीन ओढा बंदिस्त करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदार व मुख्याधिकारी घटनास्थळी गेले. याठिकाणी एका अपार्टमेंटच्या ड्रेनेज पाईपलाइनचे काम सुरू होते. या पाईपस ब्रिटिशकालीन ओढ्यात सोडण्यात आल्याच्या निदर्शनास आले. या पाईपचे तोंड ज्याठिकाणी सोडण्यात आले आहे, तिथे पुलाची पुरातन भिंत दिसत असल्याने याठिकाणी ब्रिटिशकालीन ओढा असल्याचे सिद्ध झाले आहे. हा ओढा मुजवून त्यावर बांधकाम करण्याचा संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हेतू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंता प्रदीप साबळे यांना माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. शहरातील ओढे कागदोपत्री नसल्याचा गैरफायदा काही बांधकाम व्यावसायिकांनी घेतला असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिका प्रशासनानेही संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास ओढे बंदिस्त करण्याचे धाडस होणार नाही. ओढे बंदिस्त केले जात असल्याने पावसाळ्यात ओढे तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात. पाणी उलटून ते लोकवस्तीत घुसते. तरीही प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अशी बांधकाम होताना दिसत आहेत. गोडोली येथे दोन ओढे बंदिस्त केले गेले होते, त्यानंतर हा नव्याने प्रकार सुरू होता. सदर बझार येथील ओढा बंदिस्त केल्याप्रकरणी सोमवारी उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. पालिका प्रशासन संबंधितांवर कठोर कारवाई करणार की, त्यांना क्लिन चिट देऊन बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)