शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

झेंडूच्या बागेतून लाखांची कमाई

By admin | Updated: November 9, 2015 23:27 IST

ही रानवाट वेगळी...

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यात आता पारंपरिक शेतीची कास सोडून बदलून वेगळ्या पद्धतीने शेती केली तर त्यातून फायदा हा नक्कीच घेता येतो, हे दाखवून दिले आहे. येथील सुशिक्षित शेतकरी भावांनी बी. कॉम शिक्षण घेऊन अकौन्टंटची नोकरी सोडून शेतीकडे वळलेले उमेश भिसे आणि त्यांच्यासोबत या कामात मदत करणारे त्यांचे लहान भाऊ डॉ. महेश भिसे यांना पारंपरिक पद्धतीने शेती करत राहण्यापेक्षा शेतात नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवीन पिके घेऊन विविध उत्पादने घेण्यामध्ये अधिक रस आहे. त्यामुळे कृषी सहायक तसेच तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने शेतात नवनवीन पिके घणारे भिसे बंधूंनी चालूवर्षी दीड एकरामध्ये ‘अ‍ॅरोगोल्ड’ नावाच्या झेंडूच्या रोपांची गादी वाफा पद्धतीने लागण केली आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून संपूर्ण प्लॉटवरील रोपांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. रोप लागणीनंतर साधारण या फुलांचे आठ ते दहा तोडे शेतकरी घेऊ शकतो. या पूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर या प्लॉटमधील फुले मार्केटमध्ये गेली आहेत. ऐन दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर या बंधूंनी तिसऱ्या तोड्यात ९०० ते १००० किलोचा फुलांचा माल तोडला आहे. वेळच्या वेळी या रोपांची योग्य ती निगा राखल्यास या पद्धतीच्या शेतातून भरघोस उत्पादन घेता येते. तसेच पारंपरिक निसर्गावर आधारित शेती करत असताना निसर्गाच्या बेभरवशीपणामुळे आजपर्यंत शेतकरी हा नेहमीच तोट्यातच जात आहे. त्यामुळे या पद्धतीत बदल करून कमी पाण्यात ड्रिपरच्या साह्याने अधिक उत्पादन घेऊन शेती कशी फायद्याची हे भिसे बंधूंनी दाखवून दिले आहे. या पूर्वीही यांनी प्लॉवरचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या फुलांच्या शेतीतून आर्थिक फायदा होतो. फक्त ते करण्यासाठी शेतकरी वर्गाने मानसिकता बदलली पाहिजे, हे यांनी दाखवून दिले आहे. शेतात वेगवेगळी पिके घेऊन नेहमी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असल्यामुळे या तरुण शेतकरी बंधूंनी प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकीकही प्राप्त केला आहे. सुरुवातीलाच जर फायद्याचा विचार करत बसलो तर पुढे जाताच येणार नाही. आणि याच विचारातून आम्ही दोघा भावांनी या शेतात नवनवीन पद्धतीची पिके घेण्याचे ठरवले आणि त्या पद्धतीने पिके घेत गेलो. ठिबकच्या साह्याने शेती करणे फार फायदेशीर ठरत आहे. पाण्याचा योग्य तेवढा वापर होऊन उत्पादनही भराघोस मिळवता येत आहे. आम्ही या फुलांच्या शेतीकरिता मोबाइलचा वापरही केला आहे. सध्या मोबाइलवरून वेगवेगळे फोटो काढून ते सिझेंटा कंपनीचे अधिकारी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले जात आहेत. या फुलांच्या उत्पादनातून लाख ते दीड लाख रुपयापर्यंत फायदा मिळेल . - उमेश भिसे,