शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

By admin | Updated: July 21, 2015 00:35 IST

जुना, नवीन एसटी स्टॅण्ड परिसरातील चित्र; वाहनधारक हैराण

पाटण : दिवसभरात कधीही या आणि कराड-चिपळूण रस्त्यावरील जुना स्टॅण्ड परिसरातून न थांबता आपली वाहने घेऊन जाऊन दाखवा, अशी बक्षीस योजना जाहीर करण्याची वेळ आलेल्या पाटण शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. पुन्हा बोकाळलेली अतिक्रमणे, पोलिसांचा वचक न राहिल्याने वाहनधारकांचे बेशिस्त पार्किंग आणि वडाप वाहतुकीसाठी राजरोसपणे उभी राहिलेली वाहने याचा त्रास लांब पल्ल्याच्या वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता म्हणजे गुहागर ते पंढरपूर-जत हा राज्यमार्ग होय. पाटणमधून जाणारा हा रस्ता सध्या डोकेदुखी बनलाय. कारण पाटण शहरातील नवीन बसस्थानक व जुना बसस्थानक हे आहे. पाटणच्या वाहतूक पोलिसांचे कसलेही नियंत्रण न राहिल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कसली वाहन तपासणी नाही, वाहतूक पोलिसांचे दर्शन नाही. यामुळे रस्ता आपल्या मालकीचा आहे. अशा आविर्भावात वागणारे स्थानिक वाहनधारक रस्त्याच्या कोणत्याही दिशेला आपली वाहने उभी करतात. तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्मा कदम यांनी या रस्त्यावरील काढलेली अतिक्रमणे आता हातपाय पसरू लागली आहेत. तर सम-विषम पार्किंगचे नियम बासनात गुंडाळून ठेवल्याचे चित्र दिसू लागले आहे. वाहनधारकांच्या बेताल वागण्यामुळे जुना एसटी स्टॅण्ड परिसरात सतत ट्रॅफिक जाम होते. सोमवारी बाजारादिवशी दर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. भाजीमंडईत खरेदी करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांना देखील त्रास होत असतो. (प्रतिनिधी)