कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटातही सहकारी पॅनेलची घोडदौड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:54 IST2021-07-01T15:48:52+5:302021-07-01T15:54:39+5:30
Sugar factory Election Karad Satara : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी सहकार पॅनेलची घोडदौड सुरूच असून महिला राखीव गटातूनही त्यांनी आघाडी घेतली आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत महिला राखीव गटातही सहकारी पॅनेलची घोडदौड सुरूच
कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी सहकार पॅनेलची घोडदौड सुरूच असून महिला राखीव गटातूनही त्यांनी आघाडी घेतली आहे.
कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी प्रारंभ झाला. सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणार्या कृष्णा कारखान्यासाठी मंगळवारी चुरशीने तब्बल ९१ टक्के मतदान होऊन ३४ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी सकाळी सकाळी ८ वाजता ७४ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला. यासाठी सुमारे ३०० कर्मचारी तैनात आहेत.
पहिल्या फेरीचा निकाल सत्ताधारी सहकार पॅनेलच्या बाजूने लागला असून दुसर्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि महिला राखीव गटातील निकाल लागला असून या सर्व गटात सहकार पॅनल मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. महिला राखीव गटात डॉ. सुरेश भोसले यांच्या सत्ताधारी सहकार पॅनेलच्या इंदुमती जाखले ५,२८० आणि जयश्री पाटील ५,२३८ मतांनी आघाडीवर आहेत.
सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी विजयी आघाडी घेतल्यानंतर ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष सुरु केला आहे.
महिला राखीव गट
- इंदुमती जाखले : (सहकार पॅनल) ९,७४४
- जयश्री पाटील : (सहकार पॅनल) ९,८७३
- उषा पाटील : (रयत पॅनल) २०६४
- सत्वशीला थोरात : (रयत पॅनल) २६०९
- उमा देसाई : (संस्थापक पॅनल) ४६३५
- मीनाक्षी देवी दमामे : (संस्थापक पॅनल) ४,४६४
- कांचनमाला जगताप : (अपक्ष) ४५