शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Satara: सातबारावर मीच नोंद करून घेतली म्हणत मागितली लाच, फलटणचा कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:31 IST

सातारा : सातबारावरची नोंद मीच करून घेतली. याबदल्यात मला ५०० रुपयांची लाच द्या, म्हणणाऱ्या कोतवालाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून ...

सातारा : सातबारावरची नोंद मीच करून घेतली. याबदल्यात मला ५०० रुपयांची लाच द्या, म्हणणाऱ्या कोतवालाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्याला अटक केली. ही कारवाई फलटण येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली.दीपक दौलतराव उदंडे (वय ४९, रा. कसबा पेठ, फलटण) असे कारवाई झालेल्या कोतवालाचे नाव आहे. दीपक उदंडे हा सजा फलटण येथे महसूल विभागात कार्यरत आहे. यातील तक्रारदारांनी पत्नीच्या नावे फलटण येथे दीड गुंंठे जागेसह घर खरेदी केले आहे. या घराची सातबारावर मीच नोंद करून घेतली आहे. या कामाचा मोबदला म्हणून कोतवाल दीपक उदंडे याने तक्रारदाराकडे एक हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाचशे रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने सातारा येथे येऊन लाचलुचपत विभागात लेखी तक्रार नोंदवली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी फलटण येथे सापळा लावला. त्यावेळी कोतवाल दीपक उदंडे याला पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात कोतवाल उदंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार गोगावले, गणेश ताटे यांनी केली.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सरकारी कामकाजामध्ये सुलभता आणण्यासाठी सातत्याने सक्रिय आहे. अँटी करप्शन आपल्या दारी हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. तरीसुद्धा नागरिकांकडून शासकीय कामांसाठी पैशांची मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग