Kolhapur youth draw a net | कोल्हापूरच्या युवकांनी काढली जाळरेषा

कोल्हापूरच्या युवकांनी काढली जाळरेषा

ठळक मुद्देवणवामुक्त अजिंक्यतारा : दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटचीही साथ

सातारा : पर्यावरणाच्या अभ्यासासाठी साताऱ्यात दाखल झालेल्या युवांनी ‘लोकमत’च्या पुढाकाराने सुरू असलेल्या वणवामुक्त अजिंक्यतारा मोहिमेत सहभाग नोंदविला. अभ्यासातील तीन तासांचा वेळ काढून दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी साताºयातील विद्यार्थ्यांसह श्रमदान करून जाळरेषा काढली.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला वणवामुक्त अजिंक्यतारा अभियान राबविण्याचा संकल्प सातारकरांनी केला होता. त्यानंतर रोज साता-यातील विविध गट अजिंक्यता-यावर श्रमदानाने जाळरेषा काढण्यासाठी येत आहेत. याचे वृत्त दळवीज् महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाचनात आलं. त्यानंतर त्यांनी संपर्क करून या मोहिमेत सहभाग नोंदविला.

या मोहिमेत साता-यातील ड्रोंगो संस्था, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि कला महाविद्यालयाच्या पूजा मिसाळ, प्रज्ञा मोहिते, वर्षा मिसाळ, शुभम माने, प्रज्ञा भोसले, गायत्री पवार, प्रणाली पवार, चिन्मयी गायकवाड, जीगिषा मुळ्ये, आफ्रिन पठाण, दिव्या गायकवाड, जालंदर गुरव, ओम देवळेकर, धनश्री कुंटे, पूर्वा पांझरे, वैष्णवी पेडणेकर, साक्षी लोणकर, अरिहंत किणिंगे, कृष्णा मेतर, अच्युत सबनीस, आशिष सातपुते, योगेश पाटील, कौस्तुभ भोपळे, भूषण म्हापणकर, वैभव बावडेकर, मयूर जाधव, रोहन ढाणे, मानसी साळुंखे, अपर्णा सडकर, भाग्यश्री साळुंखे, दीपाली जगताप, प्रथमेश घोडके, सेजल चौकवाले, शरयू नावडकर, श्वेता सुतार, रसिका बागल यांनी श्रमदान केले.

प्रारंभी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मानद वन्य जीवरक्षक सुनील भोईटे अभिषेक जाधव यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, परगावाहून आलेल्या या विद्यार्थ्यांना अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत आणण्याची जबाबदारी सावकार कॉलेजच्या निशांत गवळी यांनी स्वीकारली. पुष्कराज टूर अँड ट्रॅ्व्हलचे धनंजय निकम यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी चालक दीपक साळुंखे, राजू मुल्ला, पंकज देशमुख उपस्थित होते.

 

  • अग्निशामन दलाची तत्परता!

सातारा शहरातून दिसणाऱ्या दर्शनी भागात जाळरेषा काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अजिंक्यताºयाला वणवा लागल्याची माहिती सामान्य सातारकरांनी अग्निशमन विभागाला कळवली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे फायरमन सुनील निकम, योगेश भिसे, रमेश कलकुटकी आणि वाहक अनिल गाडे अजिंक्यताºयावर दाखल झाले. येथे जाळरेषा काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगितल्यानंतर काहीकाळ थांबून ही टीम पुन्हा मार्गस्थ झाली.


अजिंक्यताऱ्यावर गुरूवारी कोल्हापूरच्या युवकांनी जाळरेषा काढली.

Web Title:  Kolhapur youth draw a net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.