नववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:18 IST2019-12-13T14:16:40+5:302019-12-13T14:18:09+5:30

नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर युवकाने चाकूने वार केले. शिद्र्रुकवाडी-खळे, ता. पाटण येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला असून, या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

Knock on a ninth-grade girl | नववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार

नववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार

ठळक मुद्देनववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वारढेबेवाडीनजीक घटना : सात वार करून हल्लेखोर पसार

ढेबेवाडी : नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर युवकाने चाकूने वार केले. शिद्र्रुकवाडी-खळे, ता. पाटण येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला असून, या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

शिद्र्रुकवाडी येथील नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरातून गावानजीक असणाऱ्या खळे येथील शाळेकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी शिद्र्रुकवाडी-खळे मार्गावर एका आडोशाच्या ठिकाणी एका युवकाने विद्यार्थिनीला अडवले. तिला काही समजण्यापूर्वीच त्याने सोबत आणलेल्या चाकूने त्या विद्यार्थिनीवर वार करण्यास सुरुवात केली.

क्षणार्धात संबंधित मुलगी रक्तबंबाळ झाली. हल्लेखोराने तिच्या नाक, कान, पाय आणि हातावर तब्बल सात वार केले. या परिस्थितीतही संबंधित मुलीने त्या हल्लेखोराचा प्रतिकार केला. त्यावेळी तिची हल्लेखोराशी झटापट झाली. अखेर हल्लेखोराने नजीकच्या उसाच्या शेतातून पळ काढला.

दरम्यान, गंभीर जखमी झालेली ती मुलगी त्याचस्थितीत शाळेमध्ये गेली. शाळेत गेल्यानंतर रक्तबंबाळ स्थितीत विद्यार्थिनीला पाहून शिक्षक हादरले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले. तसेच घटनेची माहिती पोलिसांना व तिच्या पालकांना देण्यात आली. पोलिसांनी संबंधित मुलीकडे हल्लेखोराबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, दुपारपर्यंत हल्लेखोराबाबत कसलीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती.

Web Title: Knock on a ninth-grade girl