शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Satara: तरुणाचा खून करुन त्याच्याच स्टेटसला ठेवले फोटो; महिलेसह चौघांना अटक, दोघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 13:23 IST

प्रेमसंबंधाच्या संशयातून मारहाण?

कऱ्हाड : लाकडी दांडक्यासह प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. मुंढे, ता. कऱ्हाड येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे तर दोघे पसार झाले आहेत.करण संपत बर्गे (वय २८, रा. खराडे, ता. कऱ्हाड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अजित आनंदा सावंत (वय ३६), निवास आनंदा सावंत (४५), सुधीर खाशाबा सावंत (४१) व स्मिता संदीप सावंत (२८, सर्व रा. मुंढे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विनोद विश्वास माने व विनायक पवार हे दोघे पसार झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडे येथील करण बर्गे हा युवक शनिवारी दुपारी कऱ्हाडला आला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याला मुंढे येथे मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे नातेवाईक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी संशयित त्याचठिकाणी होते. त्यांनी नातेवाईकांनाही शिवीगाळ व दमदाटी केली. नातेवाईक पोहोचले त्यावेळी करण गंभीर जखमी तसेच बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे नातेवाईकांनी रिक्षातून त्याला कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करणचा मृत्यू झाला.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के.एन. पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तातडीने मुंढे येथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला. रविवारी पहाटे वारुंजी येथून चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. तर दोघेजण पसार झाले आहेत. पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी मारहाणीसाठी वापरलेली प्लास्टिक पाईप पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

प्रेमसंबंधाच्या संशयातून मारहाण?मृत करण बर्गे हा एका महिलेला सोशल मीडियावर मेसेज पाठवित होता. तसेच त्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्या संशयावरून आरोपींनी करणला मुंढे येथे बोलावून घेत मारहाण केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींकडे तपास केल्यानंतर खुनामागील कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाईलला ठेवला ‘स्टेटस’आरोपींनी मारहाण केल्यानंतर करणचा मोबाईल त्याच्याकडून काढून घेतला. तसेच त्याच्याच मोबाईलवर मारहाण केलेले फोटो, व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी त्याच्याच मोबाईलमध्ये सोशल मीडिया स्टेटसला ठेवले होते. करणचे सोशल मीडिया स्टेटस पाहूनच त्याला मारहाण झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना समजले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस