कळंबीत बेकरी व्यावयायिकाचा खून,धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:26 IST2019-10-17T16:25:53+5:302019-10-17T16:26:30+5:30

औंध : पुसेसावळी-रहिमतपूर रस्त्यावर कळंबी, ता. खटाव येथे बुधवारी रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्राने बेकरी व्यावसायिकावर वार करून खून केल्याची ...

Killer bakery businessman killed with sharp weapon | कळंबीत बेकरी व्यावयायिकाचा खून,धारदार शस्त्राने वार

कळंबीत बेकरी व्यावयायिकाचा खून,धारदार शस्त्राने वार

ठळक मुद्देकळंबीत बेकरी व्यावयायिकाचा खून,धारदार शस्त्राने वार हल्लेखोरांचे पलायन, संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना

औंध : पुसेसावळी-रहिमतपूर रस्त्यावर कळंबी, ता. खटाव येथे बुधवारी रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्राने बेकरी व्यावसायिकावर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. रविराज बाळकृष्ण लोखंडे (वय ४१, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, रविराज लोखंडे हे मागील काही वर्षांपासून औंध, पुसेसावळी परिसरात बेकरी प्रोडक्ट विकण्याचे काम करत होते. ते आपल्या वाहनातून फिरून बेकरी माल विकत असत. बुधवारी औंध परिसरातील गावांमध्ये माल विकून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते.

ते टेम्पोने रहिमतपूरकडे निघाले असता कळंबीनजीकच्या एका दूध डेअरीजवळ अज्ञातांनी त्यांचे वाहन अडवले. धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोरांनी पलायन केले. या हल्ल्यात रविराज लोखंडे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळाताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमी लोखंडे यांना औंध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात सुनील लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी बी. बी. महामुनी यांनी भेट दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.

हल्ल्यामागील कारण अस्पष्ट

रात्री साडेआठच्या सुमारास दोन दुचाकींवरून पाच हल्लेखोर आले. त्यांनी लोखंडे यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मोबाईल व गाडीची चावी लांबवली. मात्र, रोख रकमेची पिशवी गाडीत जशीच्या तशी ठेवून पुसेसावळीच्या दिशेने पलायन केले. खुनामागील कारण अस्पष्ट असून, पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Killer bakery businessman killed with sharp weapon