वाढदिवसासाठी वडिलांनी मुलीला मैत्रीणीकडं सोडलं, अन् अपहरणकर्त्याचाच आला फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 17:05 IST2022-01-15T16:12:02+5:302022-01-15T17:05:02+5:30
याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अज्ञाताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंद झाला आहे.

वाढदिवसासाठी वडिलांनी मुलीला मैत्रीणीकडं सोडलं, अन् अपहरणकर्त्याचाच आला फोन
सातारा : शहर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून तुमची मुलगी माझ्या सोबत आहे असा फोन अपहरणकर्त्या युवकाने मुलीच्या आईला केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अज्ञाताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर परिसरात एक अल्पवयीन युवती कुटुंबासोबत राहते. मंगळवार, दि. ११ रोजी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने तिच्या वडिलांनी तिला त्याठिकाणी नेवून सोडले होते. मात्र, ती बराचवेळी घरी परत न आल्याने तिचा शोध सुरु होता.
याचवेळी एका मोबाईलवरुन मुलीच्या आईच्या मोबाईलवर फोन आला आणि तुमची मुलगी माझ्याबरोबर असल्याचे सांगितले. दरम्यान, याच युवकाने मुलीचे अपहरण केली असल्याची नोंद मुलीच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक अभिजित यादव हे करत आहेत.