शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Satara News: पालमध्ये पार पडला खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह सोहळा, लाखो वऱ्हाडींकडून भंडाऱ्याची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 7:50 PM

अजय जाधव उंब्रज : ‘येळकोट येळकोट जय मल्हारऽऽऽ’चा जयघोष करत अन् पिवळ्या धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत ...

अजय जाधवउंब्रज : ‘येळकोट येळकोट जय मल्हारऽऽऽ’चा जयघोष करत अन् पिवळ्या धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत गुरुवारी खंडोबा-म्हाळसा यांच्या मुखवट्यांचा अनोखा विवाह सोहळा पाल येथे गोरजमुहूर्तावर पार पडला. पिवळ्या धमक भंडाऱ्याच्या उधळणीमुळे सूर्यास्ताची किरणे विवाहाच्या बोहल्यासह पालनगरी सोन्याचीनगरी झाल्याचे दिसत होती.महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो वऱ्हाडी भाविक पालमध्ये दाखल झाले होते. या काळात कायदासुवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती. भाविकांना खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्याचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी दर्शनबारीची सोय केली होती. प्रशासनातर्फे जादा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. पोलिस प्रशासनाने आपत्कालीन जलद कृती दल, जमाव नियंत्रण पथक तैनात केले होते. जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामकदलाची पथके, आरोग्य पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती.परंपरेनुसार दुपारी एकच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या सागवानी रथातून मिरवणुकीस कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापतीप्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून सुरुवात झाली. देवळात आरती केल्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भाविक भंडारा, खोबऱ्यांची उधळण करत होते.

ही शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात बोहल्यावर पोहोचली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीचा मानपानाचा विधी उरला. गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पालनगरी सोनेरी झाल्याचे चित्र दिसून येत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKhandoba Yatraखंडोबा यात्रा