कझाकिस्तानच्या व्यक्तीचा साताऱ्यातील हॉटेलमध्ये मृत्यू, कारण अस्पष्ट

By दत्ता यादव | Updated: November 6, 2023 15:40 IST2023-11-06T15:40:20+5:302023-11-06T15:40:44+5:30

सातारा : कझाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा साताऱ्यातील एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी समोर आली. आलेकक्षी पोडवालनी (वय ३९, रा. करांगडा कझाकिस्तान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी ...

Kazakhstani man dies in hotel in Satara, cause unclear | कझाकिस्तानच्या व्यक्तीचा साताऱ्यातील हॉटेलमध्ये मृत्यू, कारण अस्पष्ट

कझाकिस्तानच्या व्यक्तीचा साताऱ्यातील हॉटेलमध्ये मृत्यू, कारण अस्पष्ट

सातारा : कझाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा साताऱ्यातील एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी समोर आली. आलेकक्षी पोडवालनी (वय ३९, रा. करांगडा कझाकिस्तान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आलेकक्षी हे कझाकिस्तानमधील एका कंपनीत काम करत होते. साताऱ्यातील एका कंपनीमध्ये कामानिमित्त ते १० ऑक्टोबरला आले होते. महामार्गालगत असलेल्या हाॅटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. दरम्यान, रविवारी दुपारी हाॅटेलचा दरवाजा ते उघडत नव्हते. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता ते बेडवर मृतावस्थेत आढळून आले. 

त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. इथे कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. कझाकिस्तानच्या प्रशासनाशी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संपर्क साधला असून, मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक रवाना झाले आहेत.

Web Title: Kazakhstani man dies in hotel in Satara, cause unclear