शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

By सचिन काकडे | Updated: January 25, 2025 13:44 IST

पाण्यासाठी मोजावा लागत होता अवघा १ रुपया

सचिन काकडेसातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही शहराची सर्वांत जुनी पाणीयोजना आहे. १८८६ सालापासून ही योजना सातारावासीयांची तहान भागवत आहे. आज जरी या तलावाचे धरणात रूपांतर झाले असले तरी या धरणाचा आजवरचा प्रवास रंजक आहे.सातारा शहर वसविणाऱ्या शाहू महाराज थोरले यांनी शहरात तलाव, हौदांची निर्मिती केली. पुढे प्रतापसिंह महाराज यांनी जलवितरण व्यवस्था सक्षम करून शहरात पाणी खेळवले. सातारा शहराला प्रथम पाणीपुरवठा झाला तो यवतेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावातून. खापरी नळाच्या माध्यमातून हे पाणी साताऱ्यात आले. मात्र, शहराचा विस्तार वाढू लागल्याने हे पाणी अपुरे पडू लागले अन् कास पाणी योजनेचा जन्म झाला.१८७७ साली पूर्ण मातीकाम असलेल्या कास योजनेच्या कामास प्रारंभ झाला. तलाव बांधून हे पाणी पाटाने शहरापर्यंत आणण्याची ही योजना होती. १८८५ साली या योजनेसह २७ किलोमीटर पाटाचे काम पूर्णत्वास आले. कास तलाव समुद्र सपाटीपासून ११२० मीटर उंचीवर असल्याने या तलावाचे पाणी ‘सायफन’ पद्धतीने म्हणजेच नैसर्गिक उतराने शहरापर्यंत आणण्यात आले. १५ मार्च १८८६ साली पाणी पाटात सोडण्यात आले. ते एक-दोन नव्हे तर १५ दिवसांनी शहरापर्यंत पोहोचले. कास तलावापासून यवतेश्वर मंदिरापर्यंत पाट तयार करण्यात आला होता. ३ फूट रुंद व २.५ फूट खोली असणारा हा उघडा पाट आज इतिहासजमा झाला असला तरी आपले अस्तित्व टिकवून आहे.

असा आला होता खर्च..कास पाणी योजना पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आली असली तरी योजनेचा संपूर्ण खर्च पालिकेकडून करण्यात आला. सरकारकडून या योजनेस कोणतीही आर्थिक मदत मिळाली नव्हती. पालिकेने ३ लाख रुपये कर्ज ७ टक्के व्याजदराने घेऊन ही योजना पूर्ण केली. या योजनेला एकूण ३ लाख ६९ हजार १६४ रुपये खर्च आला. पाॅवर हाऊस व सांबरवाडी येथील दगडी टाक्यांमध्ये पाणी साठवून त्याचे वितरण केले जात होते.

अवघा १ रुपया करकासमधून प्रति माणशी ३० गॅलन (९० लिटर) पाणी पुरवले जाईल, असे नियोजन होते. या पाण्याचा कर १ हजार गॅलनला १ रुपया, असा निश्चित करण्यात आला होता.

असा होता जुना तलावलांबी : २१० मीटरउंची : १५ मीटररुंदी : ९०- मीटर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारDamधरणWaterपाणी