शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड : प्रीतिसंगमावर बेकायदा वाळू उपसा

By admin | Updated: September 25, 2014 23:22 IST

प्रशासन सुस्त : ट्रॅक्टरसह बैलगाड्यांचा होतोय वापर

कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम परिसरात दिवसाढवळ्या बेकायदा वाळूउपसा होत आहे़ कृष्णा-कोयनेच्या संगमाशेजारी वाळूची चोरी होत असताना प्रशासन मात्र सुस्त असून, वाळू चोरीसाठी राजरोसपणे ट्रॅक्टरसह बैलगाड्यांचा वापर होत असल्याचे दिसून येते़कृष्णा-कोयनेच्या संगम परिसरात कोणत्याही प्रकारचा अधिकृत वाळू ठेका शासनाकडून देण्यात आलेला नाही़ मात्र, अनेक दिवासांपासून या परिसरात राजरोसपणे वाळूची चोरी होत आहे़ सध्या नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे वाळवंट उघडे झाले आहे़ यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला लागून असलेल्या वाळवंटात त्याचठिकाणी वाळू चाळून बैलगाड्या व ट्रॅक्टरच्या साह्याने राजरोसपणे चोरी केली जात आहे़ या परिसरातील वाळू चोरीमुळे वाळवंटात मोठे खड्डे निर्माण होत आहेत़ प्रीतिसंगमावर दररोज लहान मुलांसह शेकडो नागरिक पोहण्यासाठी जातात़ त्यांच्यादृष्टीने हे खड्डे धोकादायक आहेत़ याशिवाय काही महिलाही धुणे धुण्यासाठी या परिसरात जातात़ खड्ड्यांमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एखाद्याला जीवही गमवावा लागेल, अशी परिस्थिती आहे़  कऱ्हाड शहरानजिक सैदापूरबाजूच्या वाळवंटातही उघड-उघड वाळू चोरी सुरू आहे़ अशा अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू चोरीवर प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचे असते़ मात्र अनेक दिवसांपासून या परिसरातील वाळू चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे का?, असा सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)संरक्षक भिंतीलाही धोकाप्रीतिसंगम बाग व स्मृतिस्थळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नदीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे़ या भिंतीमुळे पुराच्या पाण्यापासून बागेचे व स्मृतिस्थळाचे चांगले संरक्षण होत आहे़ मात्र, वाळूउपसा असाच सुरू राहिल्यास वाळवंटात खड्डे निर्माण होऊन नदीचे पात्र बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ त्याचा मोठा फटका संरक्षक भिंतीलाही बसू शकतो़ प्रीतिसंगम परिसरातील वाळवंटात काही महिन्यांपासून दररोज वाळू चोरी होत आहे़ या वाळू चोरीमुळे मोठे खड्डे निर्माण होत आहेत़ टेंभू योजनेत पाणी अडवल्यास हे खड्डे धोक्याचे ठरू शकतात़ हा बेकायदेशीर वाळूउपसा थांबवावा.- प्रमोद वेर्णेकर, माजी नगरसेवक