शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगच्या कामांना प्राधान्य, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:04 PM

सातारा : कऱ्हाड विमानतळाचे एका वर्षात विस्तारीकरण आणि रात्री विमान सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ...

सातारा : कऱ्हाड विमानतळाचे एका वर्षात विस्तारीकरण आणि रात्री विमान सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, आदी उपस्थित होते.शंभुराज देसाई म्हणाले, कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लंडिंग हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. २०१२-१३ मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी १ हजार २८० मीटरची धावपट्टी वाढवून ती १ हजार ७०० मीटर करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासाठी ४८ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास ६२ टक्के खातेदारांना भूसंपादनपोटी मिळणारा निधी शासनाने वितरित केला आहे. उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्वीकारण्याचे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.यावेळी एअरपोर्ट ॲथाॅरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील, ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी दिले.भरपाई न स्वीकारल्यास रकमेचा कोर्टात भरणाखातेदारांनी भरपाईची रक्कम न स्वीकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येऊन जमीन ताब्यात घेण्यात येईल. संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAirportविमानतळShambhuraj Desaiशंभूराज देसाई