शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पाटण पंचायत समिती सभेत ‘कालवा-कालवा’

By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST

अधिकारी गेले उठून : गटविकास अधिकाऱ्यांसह तीन सदस्य गैरहजर

पाटण : पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेला गटविकास अधिकारी व इतर तीन सदस्य गैरहजर होते. तर तब्बल दोन तास चाललेल्या या सभेत काही प्रमुख विषय वगळता निव्वळ कालवा झाल्याने काही सदस्यांसह बहुतेक अधिकारी उठून गेले. सभेत आढावा देणाऱ्या अधिकाऱ्याचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत सभापती, उपसभापती व प्रमुख सदस्य नव्हते. तसेच काही सदस्य मोबाईलवर मग्न होते. त्यामुळे सभा आहे की नाही, असेच चित्र होते. सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरू झाली. एक वाजताची सभा दीडला सुरू झाली. त्याअगोदर सभापती कक्षात देसाई-पाटणकर गटांच्या सदस्यांचे जणू मनोमिलन झाले की काय, असे चित्र दिसत होते. त्यामुळे क्षणातच सुरू होणाऱ्या सभेत जनतेच्या प्रश्नावर सदस्य पोटतिडकीने बोलतील, असे संकेत दिसत नव्हते. त्यातच आरोग्य वनविभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे प्रमुख अधिकारी हजर नव्हते. तरीसुद्धा काही मोजक्याच विषयांवर चर्चा झाली. शिक्षण विभागातील कामकाजाची माहिती सदस्यांना दिली जात नाही. तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती येऊन गेले ते सदस्यांना माहिती नाही. प्रगत आणि अप्रगत शाळांची माहिती बोगस दिली जाते. याबाबत रामभाऊ लाहोटी, राजाभाऊ शेलार यांनी आक्रमक भूमिका घेतली. पांथरपूंज या दुर्गम भागातील शाळेत एक महिला शिक्षक रुजू होत नाही. याबाबत शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यादरम्यान पांथरपूंज ग्रामस्थ तेथे उपस्थित राहिले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी जगताप यांना त्या महिला शिक्षक हजर राहतील, असे आश्वासन द्यावे लागले. तालुक्यातील ४४ गावे ८८ वाड्या-वस्त्यांना टंचाई भासणार असून, त्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पाठविले आहेत. कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला हे कामावर का नाहीत, असे शोभा कदम व राजाभाऊ शेलार यांनी विचारले. तर कृषी सहायक गावागावांत जात नाहीत. अशी तक्रार नथुराम कुंभार यांनी केली. (प्रतिनिधी)मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळमोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव हे पंचायत समिती पदाधिकारी व जनतेला जुमानत नाहीत. ते वारंवार गैरहजर असतात. आरोग्य केंद्रातील कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे आरोप उपसभापती डी. आर. पाटील, नथुराम कुंभार, विजय पवार यांनी केले.उपसभापतींनी केली नाराजी व्यक्तसभेची सांगता करताना उपसभापती डी. आर. पाटील यांनी आजच्या बैठकीस अधिकारी व सदस्य यांची गैरहजेरी लक्षणीय दिसली. तोंडावर दिवाळी आल्याचा परिणाम दिसतोय, असा टोला मारून नाराजी व्यक्त केली.आमसभा तातडीने घ्यावीसन २००७-०८ मध्ये तालुक्याची आमसभा झाली होती. त्यावेळी सुद्धा गोंधळ झाल्याने ती रद्द झाली. त्यानंतर आजपर्यंत आमसभा झाली नाही. तेव्हा सभापतींनी तातडीने आमसभा आयोजित करावी, अशी मागणी विजय पवार यांनी केली.लोकसंख्या जनगणनेचे काम माध्यमिक शिक्षकांनी करण्यास विरोध दर्शविला आहे. तेव्हा तसा ठराव घ्यावा, असे शोभा कदम म्हणाल्या. तर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांनी लोकसंख्या गणनेचे काम करावे, असे मत राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केले. त्यावर सभागृहात मोठा हशा पिकला