शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST

सातारा-सज्जनगड रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

परळी : डबेवाडी,ता. सातारा गावानजीक सातारा-सज्जनगड रस्त्यावरच्या बाजूला काही शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे सपाटीकरण केले आहे. यामुळे रस्त्याशेजारील सुमारे चार-पाच महाकाय वटवृक्ष कोसळण्याच्या स्थितीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत काही लोकांनी सूचना दिली असली तरी बांधकाम विभागाला याबाबत काही लोकांनी सूचना दिली असली तरी बांधकाम विभाग कोणाच्या हद्दीत झाडे आहेत याची चौकशी करीत आहे.सज्जनगड-ठोसेघर, उरमोडी धरण या परिसरात पर्यटकाचा ओढा वाढला आहे. त्यातच सज्जनगडावरील दासनवमी महोत्सवही सुरू झाला आहे. त्यामुळे सातारा-सज्जनगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत आहे. ही वर्दळ वाढतेय; परंतु येथे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कारण डबेवाडी गावानजीकच असणाऱ्या अनेक जमिनी मोठ-मोठ्या धनिकांनी विकत घेतल्या आहेत. वेगवेगळे प्रकल्प आणून विकसित करण्यासाठी ते याचा वापर करीत आहेत. येथे अनेकांनी शेतीचे सपाटीकरण करून घेतले आहे; परंतु हे सपाटीकरण करताना त्यांनी विचार न करता येथील महाकाय असणाऱ्या वटवृक्षाच्या मुळ्या, बुंधे काढून टाकले आहेत. ही झाडे सोसाट्याचा वारा किंवा वळवाचा पाऊस झाला तर रस्त्यातच कोसळू शकतात. रस्त्यावर कोसळल्याने जीवितहानी होऊ शकते, वाहतूक ठप्प होऊ शकते; परंतु याचा विचार न करता सार्वजनिक बांधकाम विभाग आपली हद्द कोठून सुरू होते आणि संपते याची कागदोपत्री चौकशी करत आहे. ही झाडे पूर्णता निकामी झाली आहेत. (वार्ताहर)फांद्यांचा धोकासातारा-सज्जनगड रस्त्यावर प्रवास करणारे वाहनचालक वारे वेगाने सुटले असेल तर त्याठिकाणी आल्यास गाडीला ब्रेक लावून थांबतात व नंतरच निघून जातात. अनेकवेळा या झाडांच्या छोट्या-छोट्या फांद्या कोसळल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.डबेवाडीकडे जाताना माळावरील रानाकडे आल्यावर वाहन चालविताना भीती वाटते. रस्त्याकडेच्या झाडांकडे पाहात जावे लागते. कारण सोसाट्याचा वारा सुटल्यास फांद्या वाजण्याचा आवाज येतो. त्यामुळे ते महाकाय वृक्ष कोसळतील की काय, याची भीती वाटते.-रणजित माने, वाहनचालक