शॉक लागून झारखंडच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:39 IST2019-09-03T10:38:43+5:302019-09-03T10:39:31+5:30

सोनगाव, ता. सातारा येथे शॉक लागून बिरेंदर संजय हमरम (वय २५, रा. राजपुरा, झारखंड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

Jharkhand youth dies after shock | शॉक लागून झारखंडच्या युवकाचा मृत्यू

शॉक लागून झारखंडच्या युवकाचा मृत्यू

ठळक मुद्देशॉक लागून झारखंडच्या युवकाचा मृत्यूसिमेंटचे पोल ट्रॅक्टरमध्ये भरत असताना पोल चिकटला

सातारा : सोनगाव, ता. सातारा येथे शॉक लागून बिरेंदर संजय हमरम (वय २५, रा. राजपुरा, झारखंड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बिरेंदर हमरम हा गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यात काम करत होता. सोनगाव, ता. सातारा येथे सिमेंटचे पोल ट्रॅक्टरमध्ये भरत असताना अचानक तारेला पोल चिकटला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. इतर सहकाऱ्यांनी बिरेंदरला जिल्हा शासकीय रुग्णालयात तत्काळ आणले. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.

Web Title: Jharkhand youth dies after shock