शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: अंत्यविधीस जाताना रिक्षाच्या सीटखाली ७ तोळे दागिने ठेवले, चोरट्याने लंपास केले 

By नितीन काळेल | Updated: August 11, 2023 18:56 IST

अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

सातारा : कवडेवाडी, ता. कोरेगाव येथे अंत्यविधीला जाताना रिक्षाच्या सिटखाली ठेवलेले सोन्याचे ७ तोळे वजानाचे दागिने चोरणाऱ्याच्या मुसक्या अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आवळल्या. तसेच त्याच्याकडून दागिनेही हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कवडेवाडी येथील उषा आनंदराव जगदाळे यांच्या सासूचे दि. ९ आॅगस्ट रोजी निधन झाले होते. अंत्यविधीसाठी मध्यरात्री एकच्या सुमारास सातारा येथून त्या गेल्या होत्या. त्यावेळी गळ्यातील सोन्याचे ७ तोळे वजनाचे दागिने त्यांनी स्वत:च्या रिक्षाच्या सीटखाली पर्समध्ये ठेवले होते. अंत्यविधी करुन परत आल्यावर त्यांना कोणीतरी दागिने चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्याप्रमाणे त्यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद केला.पोलिसांत गुन्हा नोंद होताच पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार उदय जाधव, प्रशांत गोरे, गणेश इथापे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर योग्य माहितीच्या आधारे सुहास धनाजी फडतरे (वय २९, रा. देगाव पाटेश्वर. सध्या रा. कवडेवाडी) याला ताब्यात घेतले. तसेच चाैकशीअंती त्याने चोरीची कबुलीही दिली. याप्रकरणी वाठार पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस