साताऱ्यात जेसीबीची सहा वाहनांना धडक, नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:00 IST2018-03-16T17:00:38+5:302018-03-16T17:00:38+5:30
सातारा येथील अदालतवाडा परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने जेसीबीची रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ६ वाहनांना धडक बसली. यात नऊजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साताऱ्यात जेसीबीची सहा वाहनांना धडक, नऊ जखमी
सातारा : येथील अदालतवाडा परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने जेसीबीची रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ६ वाहनांना धडक बसली. यात नऊजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, समर्थ मंदिर बाजूकडून नगरपालिकेच्या दिशेने येणाऱ्या जेसीबी (एमएच १२ एफबी १३९४) चालकाचा अदालतवाडा परिसरातील उतारावर वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कारला धडक दिली. त्यानंतर रिक्षा आणि समोरून येणाऱ्या तीन दुचाकीलाही ठोकर मारली.
यात नऊजण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जेसीबी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात दोन कार, तीन दुचाकी व एका रिक्षाची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे.