शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘जय जवान’ चा नारा नेरवर घुमला

By admin | Updated: April 26, 2016 00:22 IST

खटाव तालुका : दुष्काळग्रस्त किसानांच्या मदतीला भारतीय जवान दाखल; तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

पुसेगाव : ‘जय जवान जय किसान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत खटाव तालुक्यातील नेर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ आपल्या डोजरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी केला. खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भारतीय जवान दाखल झाले असून, त्यांच्या हाताला हात लावण्यासाठी शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब यांच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या बाँम्बे सेपर्स विभागाचा एक डोजर, नायक दर्शन खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार सचिन गायकवाड हे नेर येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दाखल झाले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जय जवान जय किसान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गोडसे, निवृत्त कर्नल राजेंद्र घाडगे, सुजित आंबेकर, संजय बोराटे, विद्याधर ताटे, विजय ताटे, विलासराव घाडगे, शिवाजीराव पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘१८७२ ला नेर तलावाची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून आजतागायत या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब आणि भारतीय सैन्यदल यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू झाले आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या तलावातील गाळ काढल्यामुळे निश्चितच पाण्याचा साठा वाढेल. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकावा, शेतामध्ये सुपीकता वाढेल. परिणामी शेती उत्पादनात वाढ होईल. भारतीय सैन्यदल आपल्या मदतीसाठी आले असून, त्यांच्या या कामामध्ये आपणही सर्वजण सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी या तलावातून काढण्यात येणारा गाळ विनामूल्य आपल्या स्वत:च्या वाहनातून घेऊन जावा.’ असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
जिल्हाधिकारी मुदगल यांनी नायक खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार नितीन गायकवाड यांचा सत्कार केला. (वार्ताहर)

शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे..
प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोडसे म्हणाले, ‘नेर तलावातील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रीन थंबचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे. भारतीय सैन्य दलाला ज्यावेळी जवानांची गरज लागली त्यावेळी या गावातून, परिसरातून मोठ्या प्रमाणात जवान सैन्य दलात दाखल झाले. आज हे जवान निवृत्त झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी नेर तलावातील गाळ काढण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. परिसरातील सर्व शेतकरी, निवृत्त जवान, युवावर्ग यांनी या कामामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’