Satara: इट्स रॉग नंबर, IT च्या छापेमारीवर संजीवराजेंचे बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:44 IST2025-02-06T11:42:30+5:302025-02-06T11:44:10+5:30

फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या ...

It's a rogue number Raghunathraje Naik Nimbalkar brothers of Sanjivraj react to Income Tax raid | Satara: इट्स रॉग नंबर, IT च्या छापेमारीवर संजीवराजेंचे बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Satara: इट्स रॉग नंबर, IT च्या छापेमारीवर संजीवराजेंचे बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..

फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं ने काल, बुधवारी सकाळी ६ वाजल्या पासून छापा टाकला. गेली १८ तास ही कारवाई सुरू असून फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली. 

याकारवाईनंतर आज, गुरुवारी सकाळी संजीवराजे यांचे चुलत बंधू श्रीमंत रघुनाथराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजीवराजे यांच्याकडे एक एक रूपयाचा हिशोब असून यामधून काही निष्पण होणार नाही. तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करत असून ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. आपला नेता दोन नंबरचा नाही इट्स रॉग नंबर असेही रघुनाथराजे यावेळी म्हणाले.

वाचा- अजितदादांच्या NCP त प्रवेशाची चर्चा असणाऱ्या नेत्याच्या घरी IT विभागानं टाकली धाड

काही दिवसांपासून संजीवराजे नाईक-निंबाळकर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. दरम्यानच, आयकर विभागाच्या पथकाने संजीवराजे यांच्या घरावर छापा टाकला. छाप्याबाबत माहिती मिळताच राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजीवराजे यांच्या निवास्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: It's a rogue number Raghunathraje Naik Nimbalkar brothers of Sanjivraj react to Income Tax raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.