शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आईनेच रचला मुलाच्या खुनाचा कट, दारू पाजून दगडाने ठेचले; प्रियकरासह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:19 IST

पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासांत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले

कऱ्हाड : आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचला. प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून, याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहे. कऱ्हाड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली.शोभा महादेव शेंडगे (वय ३८, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे), जयेंद्र गोरख जावळे (४०, रा. सांगवी, ता. हवेली. जि. पुणे) सिद्धार्थ विलास वाव्हळे (२५, रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, परभणी), अकबर मेहबूब शेख (२५, रा. निकाळजे वस्ती, बाणेरगाव, बालेवाडी स्टेडियमजवळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत, तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे (२४, मूळ रा. शिवडे, ता. कऱ्हाड) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडे हद्दीत सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा युवक जखमी स्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, अरुण देवकर, सहायक निरीक्षक किरण भोसले, अशोक भापकर, रवींद्र भोरे, अमित बाबर, रोहित पारनेर, सत्यवान पाटील, विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी माहिती घेतली असता, प्रशांत शेंडगे याच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे प्रशांत वारंवार वाद घालत होता. तो व्यसनाधीन असल्यामुळे आई शोभा हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केले आहे. याबाबतची नोंद तळबीड पोलिस ठाण्यात झाली आहे.

दारू पाजून दगडाने ठेचलेजयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ व्हावळे आणि अकबर शेख या दोघांना मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उंब्रजमधून वराडे येथील शेतात आणले. त्याठिकाणी त्याला दारू पाजली. तसेच, दगडाने ठेचून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. प्रशांतला जखमी अवस्थेत सोडून ते तेथून पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासांत चारही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस