शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

पोलादी अजिंक्यताऱ्यावर लोखंडाची चोरी

By admin | Published: October 12, 2015 9:00 PM

किल्ल्याची वाट बिकट : मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या सातारकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजनेची गरज

सचिन काकडे- सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याकडेला बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून गेले आहेत, तर अनेक ठिकाणच्या पाईप चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. एवढे घडूनही संबंधित विभागाचे याबाबीकडे अजूनही दुर्लक्ष आहे. सुरक्षा रेलिंगची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणचे सौंदर्य नागरिकांना नेहमीच भुरळ घालते. त्यामुळे भल्या पहाटे आबालवृद्धांची किल्ल्यावर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होते. किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मात्र, किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्याची वाट सध्या बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगमधील अनेक लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. त्यामुळे रस्त्याकडेला केवळ खांबच उभे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे चित्र असेच आहे. मात्र, संबंधित विभागाने याबाबत अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना धोका पत्करूनच चालावे लागते.नवरात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या कलावधीत किल्ल्यावर असणाऱ्या मंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने किल्ल्यावर येतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.लोखंडी पाईप गंजखात; जागोजागी खड्डेरस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी पाईप गेल्या अनेक वर्षांपासून गंज खात पडल्या आहेत. पाईप कमकुवत झाल्याने चोरट्यांना त्या पाईप जमिनीतून काढणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे लोखंडी पाईप चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.अजिंक्यतारा किल्याकड येणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांचा कसरत करूनच या रस्त्यावरून चालावे लागले. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच पडले नाही. त्यामुळे पावसामुळे हा रस्ता जागोजागी उखडला आहे.सुरक्षारक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती हवीकिल्ल्यावर चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वृक्षतोडीच्या घटनाही घडत आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.