शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

International Tiger Day 2021: 'चौकटीबाहेरच्या' जीवांचं करायचं काय?; मानव वन्यजीव संषर्घ टाळण्यासाठी 'हे' ठरेल उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 11:21 IST

'International Tiger Day 2021 This' will be useful to prevent human-wildlife conflict : वन्यजीव व्यवस्थापन आराखड्यामुळे या क्षेत्रातील वाघ, बिबट्यांसह इतर सर्व वन्यजीवांची गणना होऊन त्यांची संख्या सर्वसाधारणपणे निर्धारित होईल. त्यानुसार त्या त्या वन्यजीवांचे व्यवस्थापनामध्येही सुसूत्रता आणता येईल.

प्रगती जाधव पाटीलसातारा - राज्यातील ताडोबा, सह्याद्री, टिपेश्वर, पांढरकवडा, सागरेश्वर, दाजीपूर, भिमा शंकर, रेहकुरी, नानज यासारखी वेगवेगळ्या वन्यजीवांसाठीची राखीव वन क्षेत्रे अस्तित्वात आहेत. यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्रपणे वन्यजीव व्यवस्थापन आराखडे तयार आहेत. मात्र, राखीव क्षेत्राशिवायही वरील प्राण्यांचा राज्यभर वावर व संख्या उर्वरित क्षेत्रात तुलनेने अधिक आहे. तरीही या क्षेत्रासाठी वन्यजीव व्यवस्थापन आराखड्याचा अभाव असल्याने मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्यात यंत्रणा अपुरी ठरत आहे. हा संघर्ष जिवघेणा ठरू लागल्याने वन्यजीव राखीव क्षेत्र वगळून असलेल्या क्षेत्राचा जिल्हावार व्यवस्थापन आराखडा तयार करणे गरजेचे आहे.

वन्यजीव व्यवस्थापन आराखड्यामुळे या क्षेत्रातील वाघ, बिबट्यांसह इतर सर्व वन्यजीवांची गणना होऊन त्यांची संख्या सर्वसाधारणपणे निर्धारित होईल. त्यानुसार त्या त्या वन्यजीवांचे व्यवस्थापनामध्येही सुसूत्रता आणता येईल. याबरोबरीनेच सलगपणे सुरू असलेल्या वन्यजीव सनियंत्रणामुळे प्राण्यांचे भ्रमण मार्ग, वावरक्षेत्र, निर्धारित करता येतील. यातून भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या मानव वन्यजीव संघर्षाची तीव्रता कमी होईल. भविष्यात वाघांसह इतर संकटग्रस्त, धोकाग्रस्त वन्यजीवांचे संवर्धन करणेही शक्य होईल.

संघर्षाची काय आहेत कारणे

मार्जार कुळातील बिबट्या, वाघ हे वावरक्षेत्र तयार करून ते राखणारे प्राणी आहेत.  बिबट्या अनुकुलनामध्ये सर्वोच्च शिखरावर आहे. त्याच्या मुळ जंगली अधिवासापासून दूर मानवीवस्ती नजीक सहज मिळणाऱ्या भक्ष्यामुळे व उसशेतीतील सुरक्षित निवाऱ्यामुळे त्यांचे वावरक्षेत्र मानवीवस्तीपर्यंत पोहोचलंय, असे चित्र पश्चिम महाराष्ट्रात दिसते. तर विदर्भ मराठवाड्यात मात्र येथील व्याघ्र राखीव क्षेत्रात बिबट्यांच्या बरोबरीने वाघांची संख्या अतिरिक्त झाली आहे. परिणामी बिबट्यांप्रमाणेच तेही आता नवीन वावरक्षेत्र तयार करत आहेत. यातून प्रांतवार वाघ-बिबट-मानव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

संघर्ष टाळण्यासाठी हे करता येईल

१. वन्यजीव राखीव क्षेत्रांप्रमाणेच उर्वरित वन व इतर क्षेत्रासाठी जिल्हावार वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

२. वाघ व बिबट्यांच्या भक्ष्य प्रजातींची संख्या संतुलित राहण्यासाठी गवताळ कुरणांची निर्मिती

३. वाघ बिबट्यांसह सर्व प्राण्यांचे सनियंत्रण व्हावे

४. वन्यजीवांचे स्थलांतर मार्ग अबाधित राखण्यासाठी उपाययोजना

५. शहरे, नगरे गावांंमध्ये मोकाट जनावरे पोसली जाणार नाहीत याची व्यवस्था करणे

६. मोकाट कुत्र्यांचे शास्त्रीय पद्धतीने निर्बिजीकरण करणे

वन्यजीव राखीव क्षेत्रांच्या तुलनेत उर्वरित क्षेत्रात वाघ बिबटसह इतर वन्यजीवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वन्यजीव राखीव क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रांसाठीही वन्यजीव व्यवस्थापन आराखड्याची आवश्यकता आहे.

- सुनिल भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा

 

टॅग्स :Tigerवाघenvironmentपर्यावरणTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पSatara areaसातारा परिसर