शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

तांबवे : ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गृह अलगीकरण बंद करून गावागावात ग्रामपंचायतीने शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करावेत, अशा ...

तांबवे : ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गृह अलगीकरण बंद करून गावागावात ग्रामपंचायतीने शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करावेत, अशा सूचना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिल्या.

सुपने (ता. कऱ्हाड) येथे तांबवे जिल्हा परिषद गट व सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी प्रांताधिकारी दिघे बोलत होते. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मंडल अधिकारी पंडित पाटील, डॉ. सुशांत सावंत उपस्थित होते.

प्रांताधिकारी उत्तम दिघे म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष सुरु करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा खर्च पंधराव्या वित्त आयोगातून करावा. ग्रामस्थांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी जमेल ती मदत करावी.

लोकसहभागातून किवळ, तळबीड येथे कक्ष सुरु केले आहेत. त्यांचा आदर्श घ्यावा. गावातील डॉक्टरांना तेथील लोकांची काळजी घेण्यास सांगावे, असे यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून विलगीकरण कक्षाचा खर्च करावा, असे सांगितले. गावोगावी विलगीकरण कक्ष सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतींना शासनाने आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच या कक्षातील खर्चासाठी शासनाने स्वतंत्र निधी तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी तांबवेचे उपसरपंच अ‍ॅड. विजयसिंह पाटील यांनी केली. सरपंचांनी विलगीकरण कक्षातील अडचणी यावेळी मांडल्या. अधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन केले.

फोटो : ०३केआरडी०३

कॅप्शन : सुपने (ता. कऱ्हाड) येथे आयोजित सरपंच बैठकीत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचे भाषण झाले.