शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहने आत; एस.टी. बस बाहेर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

मायणी : मायणी बसस्थानकाजवळ प्रत्येक रविवारी भरत असलेल्या आठवडी बाजारादिवशी बाजार करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची खासगी वाहने बसस्थानकावर लावलेली असतात. ...

मायणी : मायणी बसस्थानकाजवळ प्रत्येक रविवारी भरत असलेल्या आठवडी बाजारादिवशी बाजार करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची खासगी वाहने बसस्थानकावर लावलेली असतात. त्यामुळे बसस्थानकामध्ये बस लावताना अडचण येत असल्याने बस स्थानकावर न येता बाहेरून जात असल्याचे चित्र प्रत्येक रविवारी पाहावयास मिळत आहे.

मायणी बसस्थानकाशेजारी असलेल्या गांधी मैदानावर व बसस्थानकाच्या व गांधी मैदानाच्या पाठीमागे प्रत्येकावरील आठवडी बाजार असतो. या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात, तसेच आठवडी बाजार असल्याने मायणी ग्रामस्थांसह परिसरातील खेड्यापाड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी येत असतात. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक ग्राहक स्वतःची वाहने मुख्य बसस्थानकामध्ये मिळेल त्या ठिकाणी लावून बाजारासाठी जात असतात. त्यामुळे बसस्थानकामध्ये येणारी एस.टी. बस आतमध्ये आल्यानंतर ती पाठीमागे घेऊन लावता येत नाही. असंख्य दुचाकी असल्यामुळे एस.टी. बस या दुचाकीला धडकण्याची भीती असते तसेच अनेकवेळा चालकांबरोबर शाब्दिक बाचाबाची ही दुचाकीस्वारांची होत असते. त्यामुळे बसस्थानकावर बस घेऊन न जाणे हा एकमेव पर्याय प्रत्येक रविवारी बसचालकांनी निवडला आहे. लांबपल्ल्याच्या बसेस थेट चौकातून जातात तर म्हसवड, आटपाडी, कलेढोणला जाणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या बाहेरच उभ्या करून प्रवाशांना सोडत व घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोट.. व चौकट येणार आहे..

फोटो..07मायणी

मायणी बसस्थानक दर रविवारी खासगी वाहनाने भरलेले असते. त्यामुळे एस.टी. बसचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.