सर्वसामान्यांना धास्ती ; जसी महागाई भडकतेय, तसे लाचेचे दरही महागाईप्रमाणे भडकतील काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:23 PM2020-02-20T19:23:04+5:302020-02-20T19:23:47+5:30

आता तर फसवणूक प्रकरणात तब्बल २० लाखांची मागणी झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या गुन्'ात लाच मागितलेला प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. संबंधित संशयित आरोपीने काही युवकांना सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले होते.

As inflation is rising, so will the inflation rates | सर्वसामान्यांना धास्ती ; जसी महागाई भडकतेय, तसे लाचेचे दरही महागाईप्रमाणे भडकतील काय

सर्वसामान्यांना धास्ती ; जसी महागाई भडकतेय, तसे लाचेचे दरही महागाईप्रमाणे भडकतील काय

Next
ठळक मुद्दे गुन्'ाच्या तीव्रतेवर ठरतेय लाचेची मागणी पोलिसांच्या अपेक्षा वाढतायत : पहिल्यांदाच सर्वाधिक २० लाखांची डिमांड

सातारा : एखाद्याला जसा अजार असेल तसा डॉक्टरांकडून उपचारावर खर्च अधिक सांगितला जातो. तसा आता पोलिसांकडूनही गुन्'ाची तीव्रता पाहून लाचेची मागणी केली जात असल्याचे समोर येत आहे. जितका गुन्हा क्लिष्ट तितकी लाचेची रक्कम जास्त, असे सूत्रच जणू काय पोलिसांनी ठरवून घेतलंय. फलटणमध्ये उपनिरीक्षकाने मागणी केलेली २० लाखांची रक्कमही गुन्'ाचे स्वरूप पाहूनच मागितली होती. बहुदा सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्वाधिक मागणी केलेली ही रक्कम आहे.

लोकांना या ना त्या कारणाने पोलिसांकडे जावे लागते. त्यावेळी सरसकट सर्वांकडूनच पोलिसांकडून लाचेची मागणी होते, असेही नाही. परंतु गुन्'ाचे स्वरूप पाहून अलीकडे पोलिसांचा रेट ठरत आहे. किरकोळ दखलपात्र गुन्'ामध्येही लाच मागण्याचे प्रकार घडत असतात. मुळात सर्वसामान्य लोकांना अदखलपात्र आणि दखलपात्र या गुन्'ांमधील फरक कळत नसतो. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती घातल्यानंतर संबंधित सर्वसामान्य व्यक्तीकडून ‘साहेब चहा पाण्यासाठी घ्या..पण आम्हाला सोडा,’ अशी विनवणी केली जाते. साहेबांना खूश केल्यानंतर मग अदखलपात्र गुन्'ामध्येही अशा लाचखोरांची चंगळ होतेय.

याही पेक्षा मारामारी, छेडछाड, विनयभंग, फसवणूक या गुन्'ांमध्येही हजार रुपयांपासून ते वीस लाखांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याचे अलीकडने दिसून येतेय. मारामारीच्या गुन्'ामध्ये अटक न करण्यासाठी यापूर्वी तीन पोलिसांना दोन हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. तर फसवणूक प्रकरणात दोषरोपपत्र दाखल करताना मदत करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. आता तर फसवणूक प्रकरणात तब्बल २० लाखांची मागणी झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या गुन्'ात लाच मागितलेला प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. संबंधित संशयित आरोपीने काही युवकांना सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले होते. त्यामुळे हाच पैसा त्याच्याकडून लाचेकरवी वसूल करण्याचा डाव फलटणमधील उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी याचा होता.

परंतु संबंधित आरोपीच्या नातेवाइकांनी त्याचा डाव उधळून लावला. त्याला ४ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जसी महागाई भडकतेय, तसे लाचेचे दरही महागाईप्रमाणे भडकतील की काय, अशी आता सर्वसामान्यांना धास्ती वाटू लागलीय.

 लाचेसाठी मध्यस्थीची नेमणूक
अनेकदा लाचेची मागणी थेट केली जात नाही. मध्यस्तीकरवी संबंधितांकडे मागणी होते. काही ठिकाणी अशा प्रकारच्या मध्यस्थींची नेमणूक केली असल्याचे पाहायला मिळते.

 

 

Web Title: As inflation is rising, so will the inflation rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.