कोयनेत २४ तासांत सव्वा टीएमसी पाण्याची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:24 IST2019-07-01T14:22:40+5:302019-07-01T14:24:26+5:30
मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून कोयना धरण परिसरात जोर वाढला आहे. त्यामुळे रविवारी सकाळच्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे.

कोयनेत २४ तासांत सव्वा टीएमसी पाण्याची वाढ
ठळक मुद्देकोयनेत २४ तासांत सव्वा टीएमसी पाण्याची वाढमान्सूनच्या पावसाचा कोयना धरण परिसरात जोर
सातारा : मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून कोयना धरण परिसरात जोर वाढला आहे. त्यामुळे रविवारी सकाळच्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे.
यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात झाली. त्यामुळे २० जूननंतरच कोयना व परिसरात पाऊस सुरू झाला. तर गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे.
परिणामी धरणातही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. रविवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत धरणातील पाणीपातळीत सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात १४ हजार ५०१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.