शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

Satara Crime: संजय शेलार यांच्या खुनाचे कारण आले समोर, अरुण कापसे याच्यासह पाचजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:53 IST

अरुण कापसेला आश्रय देणाऱ्यांचाही समावेश

सातारा : अंधारी, ता. जावळी येथील संजय गणपत शेलार यांच्या खूनप्रकरणात मुख्य सूत्रधार अरुण कापसे (वय ५६, रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) याच्यासह एकूण पाचजणांना मेढा पोलिसांनी अटक केली. यामध्ये अरुण कापसे याला मदत करणाऱ्या व आश्रय देणाऱ्या दोघांचा समावेश आहे. अरुण कापसे याच्या सांगण्यावरून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.रामचंद्र तुकाराम दुबळे (वय ३७, रा. मतकर काॅलनी, शाहूपुरी, ता. सातारा), विकास अवधूत सावंत (३५, रा. कासार बिल्डिंग, मोळाचा ओढा, सातारा), अजिंक्य विजय गवळी (३६, रा. शनिवार पेठ, नागोबा कट्टा, मिरज, जि. सांगली), प्रशांत मधुकर शिंत्रे (३२, रा. बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फळणी, ता. जावळी येथे २ जानेवारी रोजी संजय शेलार यांचा मृतदेह आढळून आला होता. मेढा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मोबाइल सीडीआरच्या तांत्रिक विश्लेषण करून संजय शेलार यांचा खून करणारा आरोपी रामचंद्र दुबळे याला १६ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली. पोलिस कोठडीत असताना त्याने अरुण कापसे याच्या सांगण्यावरून संजय शेलार याचा मी खून केला आहे. अशी कबुली दिली. या खुनाचा कट अरुण कापसे, रामचंद्र दुबळे, विकास सावंत यांनी मिळून रचला असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी बाऊन्सर असलेल्या विकास सावंत याला अटक केली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी तत्काळ चार पोलिस पथके नेमून गुन्ह्यातील आरोपी अरुण कापसे याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊन त्याला मिरज येथून अटक केली. तसेच अरुण कापसे याला पळून जाण्यासाठी मदत करणारा अजिंक्य गवळी व लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांनाही दि. २२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. सर्व संशयितांना मेढा न्यायालयाने ७ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.खुनाचे ‘हे’ कारण आले समोरया खुनाचे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले असून, अरुण कापसे हा महिलेशी लगट करून जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तसेच बांधकामावरील कामगारांच्यासमोर कापसे याला संजय शेलार हा शिवीगाळ करत होता. याचा राग मनात धरून संजय शेलार यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस