शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:16 IST

..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

कऱ्हाड : ‘मंकीपॉक्स’ विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारील देशात पोहोचला आहे. त्यामुळे संसर्गीत देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या ‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. राज्यात उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने सध्या काढता पाय घेतला आहे. मात्र, आता नव्या आजाराने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात ‘मंकीपॉक्स’ आजाराने थैमान घातले आहे. सत्तरहून अधिक देशांत ‘मंकीपॉक्स’ आजाराचा फैलाव झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आजाराच्या प्रकोपामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणीही जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या ‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, मंकीपॉक्स विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. संसर्गीत देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?‘मंकीपॉक्स’ व्हायरसमुळे ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केली आहे. आफ्रिकेत उगम झालेला हा व्हायरस आता वेगाने पसरत आहे. मंकीपॉक्स पाकिस्तानात पोहोचला आहे. आपल्या देशात त्याचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलावीत, अशी आग्रही विनंती करीत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

..तर गंभीर परिणाम भोगावे लागतीलउच्च संसर्ग असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर चाचणी आणि विलगीकरण सुविधांची अंमलबजावणी केली जावी. ही काळजी कोरोनादरम्यान योग्य प्रकारे घेण्यात आलेली नव्हती. वेळेवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या संक्रमित व्यक्तीचा शोध न घेता त्याला देशात येऊ दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चिंताही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदे