शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

इंजिन वाचलं तर गाडी वाचली!

By admin | Updated: August 22, 2014 00:50 IST

गाड्या दुरुस्ती करणाऱ्यांकडे आणि ‘सर्व्हिस स्टेशन’मध्ये गुरुवारी वाहनचालकांची रीघ

सातारा : बुधवारी झालेल्या ढगफुटीमुळे सर्वाधिक नुकसान वाहनांचे झाले आहे. यापैकी ज्या गाडीच्या इंजिनात चिखलमिश्रित पाणी गेले असेल, ती गाडी कायमची खराब झाली असे समजावे, अशी माहिती वाहनदुरुस्ती क्षेत्रातील व्यक्तींनी दिली. अनेक गाड्या आज ‘स्टार्ट’च झाल्या नाहीत. गाड्या दुरुस्ती करणाऱ्यांकडे आणि ‘सर्व्हिस स्टेशन’मध्ये गुरुवारी वाहनचालकांची रीघ लागली होती.साताऱ्यातील बुधवारच्या पावसात अनेक वाहने अक्षरश: डुंबत होती. यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. दुचाकी वाहने तर अनेक ठिकाणी प्रवाहाबरोबर लांबवर वाहून गेली. अस्ताव्यस्त वाहनांमध्ये चिखलमिश्रित पाणी शिरले. हे पाणी इंजिनमध्ये शिरले असल्यास गाडीची दुरुस्ती जवळजवळ अशक्य आहे, असे एका दुचाकी कंपनीच्या तज्ज्ञांनी सांगितले. या कंपनीच्या शोरूममध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे बावीस दुचाकी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्या, तर काही दुचाकींमध्ये पाणी शिरून त्या निकामी झाल्या. यात नव्या दुचाकींबरोबरच काही खरेदीदारांनी सर्व्हिसिंगसाठी दिलेल्या गाड्यांचाही समावेश आहे. चोरट्यांकडून संधी साधून या गाड्यांमधील सुटे भाग चोरीला जाण्याची शक्यता असल्यामुळे या गाड्या सुरक्षित ठिकाणी हलविल्या जातील आणि नंतर त्यांची तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शहराच्या अनेक भागांत चारचाकी वाहने निम्म्याहून अधिक पाण्याखाली बुडाली. यातील अनेक वाहने आज ‘स्टार्ट’ होत नव्हती. (प्रतिनिधी)माझ्या शोरूममधील २२ वाहनांचे नुकसान झाले आहे. याखेरीज शोरूममध्ये पाणी शिरल्याने आॅईल, सुटे भाग यासह झालेले एकंदर नुकसान सुमारे बारा लाखांच्या घरात गेले आहे. कंपनीने तातडीने तंत्रज्ञ पाठविले आहेत. सुरक्षित ठिकाणी नेऊन गाड्यांची तपासणी केली जाईल.- इंद्रजित मोहिते, व्यावसायिक बुधवारच्या पावसात माझ्या गळ्यापर्यंत पाणी आले होते आणि वाचवायलाही कोणी येऊ शकत नव्हते. शोरूममध्ये साचलेल्या पाण्यात आॅइलचे आणि अ‍ॅसिडचे कॅन सांडले, तेव्हा अंगाची आग होऊ लागली. तशा स्थितीत तीन तास घालवल्यानंतर माझी सुटका झाली आणि मग मी उपचार घेतले.- स्वाती केळकर, सर्व्हिस मॅनेजर