शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पावसाळी पिकनिकचा बेत आखताय मग या ठिकाणांना नक्की भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 3:14 PM

पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू. या पावसाची मजा लुटण्यासाठी अनेकजण विकेंडला घराबाहेर पडतात अन् आपल्या आवडीच्या स्थळांना भेटी देतात.

सातारा : पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू. या पावसाची मजा लुटण्यासाठी अनेकजण विकेंडला घराबाहेर पडतात अन् आपल्या आवडीच्या स्थळांना भेटी देतात. सातारा जिल्ह्यातही मान्सूनचे नुकतेच आगमन झाले असून, ओसाड डोंगरांवर हळूहळू हिरवा शालू पांघरू लागला आहे. सर्वत्र धुक्याची दुलई पसरू लागली आहे. पावसाच्या सरी धबधबे कोसळण्याची चाहूल देऊ लागल्या आहेत. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहे. वीकेंडला जायचं कुठे? हा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर सातारा जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आपली वाट पाहत आहेत.हुंबरळी (पाटण)पाटण तालुक्यातील कोयनानगर पासून तीन किलोमीटर  अंतरावर हुंबरळी हे एका उंच टेकाडावर वसलेलं गाव. या ठिकाणाहून आपल्याला हिरव्यागार वनराईत लपलेल्या कोयना जलाशयाचे विहंगमय दृश्य नजरसे पडते. सध्या या ठिकाणी जंगल सफारी बरोबरच कोयना जलाशायात नौकाविहाराची मजा पर्यटकांना लुटता येते. या ठिकाणी राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह (एमटीडीसी) काही खासगी रिसॉटही आहे.  हुंबरळीला जाण्यासाठी सातारा किंवा क-हाड येथून पाटणला यावे लागते. यानंतर पाटणपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना या गावी यावे लागते. कोयनेपासून ३ किलोमीटर अंतरावर हुंबरळी हे गाव आहे.तापोळामहाबळेश्वर तालुक्यात वसलेल्या तापोळा या गावाला मिनी काश्मिर म्हणून ओळखले जाते. तापोळ्याला जाण्यासाठी प्रथम महाबळेश्वरला यावे लागते. या ठिकाणाहून २८ किलोमीटर अंतरावर असलेलं तापोळा हे गाव कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. निळे पाणी, प्रदूषणमुक्त वातावरण असे या परिसराचे वर्णन करता येईल.  याठिकाणी स्वत:च्या कारने जाता येते. तसेच एसटी बसेसची व्यवस्थाही आहे. धुक्याच्या दुलईत आपल्याला या ठिकाणी नौकाविहाराचा आनंद लुटता यतो. लॉँचमध्ये बसूनही जलाशयाची सैर करता येते.कासकासचे पठार सातारा शहराच्या पश्चिमेकडे साधारण: २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. जैवविविधतेने नटलेल्या या पठारावर आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात विविध प्रकारची फुले फुलतात. मान्सूनचे आगमन झाल्याने येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडू लागले आहे. सोसाट्याचा वारा अन् अवतीभोवती फिरणा-या गर्द धुक्यातूनवाट काढत पुढे जाण्याचा थरार येथे अनुभवण्यास मिळतो. मात्र, ही मजा अनुभवण्यासाठी आपल्याकडे स्वत:ची कार अथवा दुचाकी असायला हवी. कास मार्गावर राहण्यासाठी हॉटेल व जेवणाचीही उत्तम व्यवस्था आहे.सज्जनगड/ठोसेघरसातारा शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर सज्जनगड हा किल्ला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पाय-या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे.   गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. या गडावरून अथांग पसरलेल्या उरमोडी धरणाचे मनोहारी दृश्यनजरेस पडते. ढग आपल्याचा स्पर्शून जात असल्याचा अनुभव येथे येतो. या ठिकाणी जाण्यासाठी सातारा व राजवाडा बसस्थानकातून एसटी बसेसची सोय असून, सर्व गाड्या गडाच्या पायथ्याशी जातात. सज्जनगड फाट्यापासून पुढे सुमारे ९ किलोमीटर अंतरावर ठोसेघर आहे. या ठिकाणचा धबधबा प्रसिद्ध असून धबधबा प्रवाहीत झाल्यानंतर हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देतात.टेबललॅँड/पाचगणीथंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीची देशात ओळख आहे. थंड व उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यामुळे पाचगणीला आरोग्य धाम असे म्हटले जाते. येथे येणा-या पर्यटकांना टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. टेबललॅँड हे आशिया खंडातील सर्वात उंच पठार आहे. सोसाट्याच्या वा-याची अनुभूती अन् कट्यावरून उलट दिशने येणारा पाऊस पहायचा असेल तर टेबललॅँडलायावे लागते. पुण्याहून येणा-या पर्यटकांना पुणे-बेंगलोर महामार्गावरून वाई मार्गे पाचगणीला यावे लागते. शहरापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर हे पठार आहे. पुण्यापासून अवघ्या १०० किलोमीटर अंतराव पाचगणी हे शहर वसलं आहे. या ठिकाणी घोडागाडीतून पठाराची सैरही करता येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर