शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव यांचा चौकार; यंदा उदयनराजे बरोबरी साधणार..? 

By नितीन काळेल | Updated: May 11, 2024 19:09 IST

सातारा लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसने सर्वाधिक वेळा केले नेतृत्व

नितीन काळेलसातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या आतापर्यंत १८ सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा नेतृत्व केले. तर ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी हॅट्ट्रिक साधली आहे. तर लक्ष्मणराव पाटील यांनी दोनवेळा तर इतर पाचजणांनी एकदा सातारा लोकसभेचे नेतृत्व केले आहे. आताच्या निवडणुकीत उदयनराजेंनी बाजी मारली तर यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीत ते येणार आहेत.सातारा लोकसभा मतदारसंघाचे आतापर्यंत दिग्गजांनी नेतृत्व केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर, क्रांतिसिंह नाना पाटील आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर दिग्गजांनीही सातारा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून आपला ठसा उमटवला आहे. या मतदारसंघावर अधिक करून काॅंग्रेसचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा क्रमांक लागतो. तर शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीनेही एकदा विजय मिळविलेला आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ ला प्रथम लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये लोकसभेच्या सातारा उत्तर मतदारसंघातून गणेश अळतेकर यांनी विजय मिळवला होता. पहिल्याच निवडणुकीत काॅंग्रेसला यश मिळाले. मात्र, दुसऱ्या १९५७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मतदारसंघावर झेंड फडकवला. काॅंग्रेसचे उमेदवार अळतेकर यांना दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. असे असलेतरी १९६२ च्या तिसऱ्या निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांना साताऱ्यावर कब्जा करता आला नाही. देशभक्त किसन वीर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मतदारसंघात पुन्हा काॅंग्रेसचा झेंडा रोवला गेला.

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतराव चव्हाण प्रथमच सातारा मतदारसंघात उभे राहिले आणि विजयही झाले. यानंतर १९८० पर्यंतच्या इतर तीन निवडणुकांतही यशवंतराव चव्हाण विजयी झाले. चव्हाण यांनी देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ते उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. तसेच सातारा मतदारसंघ काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहिला. १९८४ मध्ये चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर १९८४ च्या डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रतापराव भोसले हे काॅंग्रेसकडून रिंगणात उतरले आणि विजयही मिळवला. त्यानंतर १९८९ आणि ९१ च्या निवडणुकीतही भोसले काॅंग्रेसकडून विजयी झाले.मात्र, याच काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. अशा काळातच १९९६ ला लोकसभा निवडणूक झाली. यामध्ये हिंदुराव नाईक-निंबाळकर विजयी झाले आणि मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांचा पराभव झाला. त्यानंतर भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. मात्र, १९९८ ला काॅंग्रेसकडून अभयसिंहराजे भोसले निवडणुकीत उतरले आणि विजयही मिळवला.१९९९ ला शरद पवार हे राष्ट्रीय काॅंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील निवडून आले, तर शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर दुसऱ्या तर राष्ट्रीय काॅंग्रेसचे उमेदवार दादाराजे खर्डेकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २००४ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांनी दुसऱ्यावेळी विजय मिळविला. यावेळी शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झालेला. २००९ पासून २०१९ पर्यंतच्या तीन निवडणुका या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून जिंकल्या. तसेच हॅट्ट्रिकही साधली.मात्र, निवडणुकीनंतर चारच महिन्यात उदयनराजेंनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने कब्जा केला. श्रीनिवास पाटील खासदार झाले. तर उदयनराजेंचा पराभव झाला. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक ही १८ वी आहे. या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे रिंगणात होते. उदयनराजे विजयी झाले तर ते चाैकार ठोकणार आहेत. तर शशिकांत शिंदे विजयी झाल्यास त्यांचा संसदेत प्रथमच प्रवेश होणार आहे.

काॅंग्रेस १० तर राष्ट्रवादी ५ वेळा विजयी..

सातारा लोकसभेसाठी आतापर्यंत १८ वेळा सार्वत्रिक तर एकदा पोटनिवडणूक झाली आहे. आताच्या २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जानेवारीला लागणार आहे. तरीही आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकीत काॅंग्रेसने सर्वाधिक १० वेळा सातारा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. तर राष्ट्रवादीने पाचवेळा विजय मिळवलाय. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेनेने एकदा सातारा मतदारसंघात एकदा झेंडा फडकवला आहे. गेल्या २० वर्षात सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आताच्या या निवडणुकीत हा बालेकिल्ला शाबूत राहतो की याला भगदाड पडते हे पाहणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस