लोक सर्तक राहिल्यास गुन्हे आटोक्यात -पोलीस अन् जनतेचं आपुलकीचं नातं हवं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:31 IST2019-08-04T01:30:50+5:302019-08-04T01:31:47+5:30
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवानांचे नेटवर्क स्ट्राँग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच यादीवरील गुन्हेगार आणि गुन्ह्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाºया गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे.

लोक सर्तक राहिल्यास गुन्हे आटोक्यात -पोलीस अन् जनतेचं आपुलकीचं नातं हवं
दत्ता यादव ।
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवानांचे नेटवर्क स्ट्राँग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच यादीवरील गुन्हेगार आणि गुन्ह्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाºया गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे. पोलीस आणि जनतेचं आपुलकीचं नातं निर्माण होण्यास प्रयत्न केले जात आहेत. हे नवे धोरण शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी अवलंबले असून, या संदर्भात त्यांच्याशी केलेली बातचित..
प्रश्न : गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी काय करायला हवं?
उत्तर : जनता सतर्क राहिली तर निम्म्याहून अधिक गुन्हे घडण्यापासून टळतात. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे हे आमचे मुख्य काम आहे. पोलिसांचं जनतेशी आपुलकीचं नातं असायला हवं. साताºयाची जनताही सुज्ञ आहे. आपल्या आजूबाजूला कसल्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवायला हवं. गुन्हेगारीमध्ये सक्रिय असणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर असते. असे गुन्हेगार पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नसतात.
प्रश्न : आपल्या टीमचं वेगळेपण काय?
उत्तर : आमच्या सर्वच पोलीस जवानांच्या टीमचे शहरात नेटवर्क अत्यंत चांगलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी टीम सक्षम आहे. गुन्हा घडू नये, यासाठी टीम प्रयत्नशील असते. मात्र, तरीही गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच आमची टीम गुन्हा उघडकीस आणते.
प्रश्न : गुन्ह्यांमध्ये अलीकडे लहान मुलांचाही सहभाग दिसून येतोय?
उत्तर : लहान मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष झाल्यानंतर हे प्रकार घडत आहेत. वडील आणि मुलाचं नातं मैत्रीचं असायला हवं. या मुलांना कायदा सुधारण्याची संधी देते; परंतु पुढचे काम पालकांचे आहे. मुलांचे करिअर घडण्याची हीच वेळ असते. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये मैत्रीचे नाते तयार करुन संस्कार करावेत.
पुण्यातील अनुभव कसा होता..
पुण्यामधील तळेगाव दाभाडे येथे काम करत असताना तेथील टीमचेही चांगले सहकार्य लाभले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले. नागरिकांना सतर्क करण्याचे काम आम्ही साताºयातही करत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरते.
सीसीटीव्ही पाहिजे
्र्रपोलिसांचा सोबती म्हणून सध्या सीसीटीव्हीला अत्यंत महत्त्व आले आहे. शंभर पोलिसांचे काम एक सीसीटीव्ही करू शकतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने महिलेला चाकूचा धाक दाखवून त्यांची दुचाकी चोरून नेली होती. त्यावेळी हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यामुळे संबंधित संशयितापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत झाली. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सीसीटीव्ही हवेच, असे पाटील यांचे मत आहे.
साताºयात पहिल्यांदाच मी काम करतोय. वरिष्ठांपासून आमच्या टीमपर्यंत सर्वांचेच सहकार्य मिळतेय. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होत आहे.
- मुगुट पाटील, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे, सातारा