राजकारणापासून अलिप्त रहावेसे वाटते : उदयनराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:49 IST2019-08-30T23:49:06+5:302019-08-30T23:49:10+5:30
सातारा : कोण इकडं जाणार कोण तिकडं जाणार याच्याशिवाय सध्या काहीच चर्चा नाही. सध्याचे वातावरण पाहता राजकारणापासून अलिप्त रहावे ...

राजकारणापासून अलिप्त रहावेसे वाटते : उदयनराजे
सातारा : कोण इकडं जाणार कोण तिकडं जाणार याच्याशिवाय सध्या काहीच चर्चा नाही. सध्याचे वातावरण पाहता राजकारणापासून अलिप्त रहावे असे वाटत असल्याचे मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
खासदार उदयनराजे भोसले यांची शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी जलमंदिर येथे शुक्रवारी दुपारी भेट घेतली. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले.
उदयनराजे म्हणाले, सध्या खूप वेगवेगळ््या चर्चा सुरू आहेत. राजकारणाच्या पातळीवर सर्वचजण अस्वस्थ आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वजण काळजीपूर्वक पाऊले टाकत आहेत. पण त्याबरोबरच सगळीकडची परिस्थिती पाहिली तर खूपच वेगळी आहे. या राजकारणाचा उबग आल्यासारखे वाटते. त्यामुळे कधी कधी राजकारणापासूनच अलिप्त रहावे असे वाटते.
संभाजी भिडे यांच्या भेटीविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले, आमचे खूप पूर्वीपासून सख्य आहे आणि मला कोणीही कधीही भेटू शकतो. त्यामुळे त्यांनीही भेट घेतली. यामध्ये सध्याच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसून ही भेट केवळ औपचारिक होती.