पत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची पतीची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:17 IST2020-07-24T12:14:45+5:302020-07-24T12:17:25+5:30
पतीने शरीरसंबंधावेळी व्हीडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी उच्चशिक्षित पत्नीला मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे.

पत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची पतीची धमकी
सातारा : पतीने शरीरसंबंधावेळी व्हीडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी उच्चशिक्षित पत्नीला मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. संबंधित विवाहितेच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यावही गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी, संबंधित विवाहितेचा विवाह ऑगस्ट २०१७ मध्ये झाला होता. यावेळी तिच्या माहेरकडून ८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख १ लाख हुंडा म्हणून दिले होते. लग्नावेळी पतीने रिसेप्शन रद्द केले होते. त्याबाबत उच्चशिक्षित असलेल्या पत्नीने विचारणा केल्यानंतर चिडून पतीने मारहाण केली.
यानंतर पती आणि सासू याने तब्येत कमी कर, तुला जेवण बनवता येत नाही, माहेरूनहून १२ लाख रुपये आण अशा अनेक कारणांवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
तसेच पतीने शरीर संबंधावेळी उच्चशिक्षित पत्नीचे व्हिडिओ बनवून व फोटो काढले होते. घरात होणार्या जाचहाटाबद्दल कोणास सांगितले तर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून पतीकडून विवाहितेला मारहाण करण्यात येत होती.
दरम्यान, विवाहितेला १२ लाख रुपये माहेरवरून घेऊन ये, या कारणावरून घरातून हाकलून दिले. याबाबतची फिर्याद शाहुुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पती व सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.