शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गांजा ओढू नका सांगणं जीम इन्सट्रक्टरला भोवलं, दिल्या अंगभर जखमा

By दत्ता यादव | Published: December 03, 2022 8:43 PM

चाैघांवर गुन्हा; पेवर ब्लाॅक अन् काचेच्या तुकड्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला चुकीचं करू नको, असं सांगणही अलीकडे कठीण  झालं आहे. कोण कसा उलट प्रतिसाद देर्इल, याचा नेम नाही, असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडलाय.सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या चाैघांना जीम इन्स्टक्टरनं ‘इथेगांजा ओढू नका,’  इतकच सांगितलं.  या कारणावरून चाैघांनी जीम इन्स`ट्रक्टरला इतकं मारलं की त्यांच्या अंगावर अंगभर जखमा झाल्या. आता मारहाण करणाऱ्या चाैघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

याबाबत अधिक माहिती अशी की, जीम इन्स`ट्रक्टर अरूण भोसले (वय ३६, रा. केसरकर पेठ, सातारा) हे नगर पालिकेजवळील एका मेडीकल समोर दि. १ रोजी रात्री पावणेअकरा वाजता उभे होते. त्या ठिकाणी चाैघेजण गांजा ओढत होते. हे पाहून अरूण भोसले यांनी त्यांना गांजा ओढू नका, असं सांगितलं.  या कारणावरून श्रीसनीवंजारी याने भोसले यांच्या कानावर सिमेंटचा पेवर ब्लाॅक मारला. तरवंजारीचे मित्र अभिषेक पाटोळे व इतर दोघांनी त्यांच्या हातातील काचेच्या तुकड्याने तसेच सिमेंटच्या पेवरने भोसले यांच्या पाठीवर, मानेवर, पोटावर, कमरेवर आदी ठिकाणी मारहाण केली. एवढेच नव्हे  तर  त्यांच्या  चष्म्यावर पाय देऊन चष्मा फोडून नुकसान केले. यामध्ये भोसले हे जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात वरील चाैघांविरोधात फिर्याद दिली. या तिघांचे संपूर्ण पत्ता, नाव काय आहे, हे भोसले यांना माहिती नाही.

दरम्यान, समाजात अशा प्रकारचं वाईट कृत्य घडत असेल तर तेरोखलं जाणं प्रत्येकाचं कर्तव्य असते. केवळ  बघ्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष केले नाही पाहिजे. पण दुसरीकडे समाजातील अशा काही व्यक्ती पुढे येतात पण त्यांनाच असे वाईट अनुभव येत असल्याने पुन्हा अशा घटना घडत असतील तर अशा घटना रोखण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. असे पोलिस सांगतायत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर