शिदेंवाडी येथे हाँटेल व्यवसायिकावर हल्ला...! व्यवसायिक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 19:06 IST2019-12-21T19:03:06+5:302019-12-21T19:06:31+5:30

यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरून चाकू,बॅटरी,चप्पल जप्त केली आहे. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील सूर्या या श्वानपथकाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी सूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले.

Hotel owner | शिदेंवाडी येथे हाँटेल व्यवसायिकावर हल्ला...! व्यवसायिक गंभीर जखमी

शिदेंवाडी येथे हाँटेल व्यवसायिकावर हल्ला...! व्यवसायिक गंभीर जखमी

ठळक मुद्देपोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची घटनास्थळी भेट...! चोरी की अन्य काही पोलीसांकडून तपास सुरुसूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले.

शिरवळ : मुराद पटेल

खंडाळा तालुक्यातील शिरवळजवळ असणाऱ्या शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये हॉटेल मांडवलीचे मालक मुरलीधर उर्फ दादासाहेब बबन सोनावणे (वय ५२ वर्ष रा.शिंदेवाडी ता.खंडाळा ) यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, सदरील हल्ला हा चोरीच्या उद्देशाने झाला आहे कि अन्य कारणातून याबाबतचा पोलीस तपास करीत आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरून चाकू,बॅटरी,चप्पल जप्त केली आहे. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील सूर्या या श्वानपथकाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी सूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले. घटनास्थळी सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे ,शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे ,एलसीबीचे पथक ,शिरवळ पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तपासाबाबत सूचना केल्या. दरम्यान अज्ञाताच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुरलीधर उर्फ दादासाहेब सोनावणे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यवर अधिक उपचार सुरु आहे. याबाबतची फिर्याद शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहे.

Web Title: Hotel owner