कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 11:25 AM2021-12-01T11:25:45+5:302021-12-01T11:29:34+5:30

बुधवारी मध्यरात्री राञी दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडी जवळ कार-ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Horrific car-truck accident; Both killed on the spot | कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

Next

दहिवडी : बुधवारी मध्यरात्री राञी दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडी जवळ कार-ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. फलटण वरुन दहिवडी कडे येत असताना हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचुरा झाला होता.

पियुश शैलेंद्र खरात (वय-२२)  व स्वयम सुशिल खरात (१६) अशी या मृत दोघांची नावे आहेत. तर, अक्षय दिपक खरात हा गंभीर जखमी झाला.

याबाबत माहिती अशी की, दहिवडी येथील पियुष खरात, स्वयंम खरात व अक्षय खरात हे तिघेजण राञी दीडच्या सुमारास स्वीफ्ट कार मधून फलटण वरुन दहिवडीला येत होते. दरम्यान दहिवडीकडून एक ट्रक फलटणकडे चालला होता. याचदरम्यान दहिवडी जवळ कार व ट्रकची भीषण धडक झाली. यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले.

Web Title: Horrific car-truck accident; Both killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app