चाफळ विभागात काम करणाऱ्या सर्व खात्यांतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:43+5:302021-06-16T04:50:43+5:30
चाफळ : चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. डॉ. सचिन कुराडे, आरोग्य सहायिका भारती हांडे ...

चाफळ विभागात काम करणाऱ्या सर्व खात्यांतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार
चाफळ : चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्ध्यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. डॉ. सचिन कुराडे, आरोग्य सहायिका भारती हांडे व कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन कोरोनाबाधितांवर उपचार केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत आम्ही चाफळकर फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने त्यांचा उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या हस्ते सन्मानपत्र देत नुकताच कोरोना योध्दा म्हणून सत्कार केला.
चाफळ ता. पाटण येथील आम्ही चाफळकर फाउंडेशन ही एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेने चाफळ विभागात काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह विविध पोलीस, वीज वितरण कंपनी, अंगणवाडी, आशासेविका, बँक कर्मचारी, होमगार्ड, मेडिकल स्टोअर्स चालक तसेच खासगी डाॅक्टर यांचा नुकताच चाफळ येथे कोरोना योध्दा म्हणून नुकताच सन्मान केला.
या वेळी आम्ही चाफळकर फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, डॉ. सचिन कुराडे, बाळासाहेब बहुलेकर, पुरुषोत्तम पाटील, शिवानंद वेल्हाळ, अभिजित पाटील, राजेंद्र खरात, दत्तात्रय गायकवाड, राजेंद्र राऊत, श्रीकांत डोणोलीकर, सचिन साळुंखे, मकसुद मोमीन, धनाजी लोंढे, सूर्यकांत वाघमारे आदींची उपस्थिती होती.