वैभव पतंगे -
सातारा : सातारा शहरामध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशनला मिळाला आहे. सारस्वतांच्या या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शविणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने ‘अटकेपार’ स्मरणिकेतून राजधानी सातारा शहराचा इतिहास, साहित्य, संस्कृती, भाषा, गड-किल्ले, ऊर्जेचे स्त्रोत सर्वांसमाेर उलगडणार आहे.
सातारा हा मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला प्राचीन इतिहास असून ही भूमी मराठ्यांचे शौर्य तसेच स्वातंत्र संग्रामातील क्रांतिकारकांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र असलेल्या साताराच्या भूमीतून मराठ्यांनी आपले शौर्य गाजवत अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला. त्यामुळेच ‘सातारा आणि अटकेपार’ यांचे समीकरण साम्राज्याचा विस्तार आणि पराक्रम दर्शविते. म्हणून स्मरणिकेला ‘अटकेपार’ असे नाव देण्यात आले आहे. ५६ लेखांसह २७० पृष्ठांच्या स्मरणिकेत मराठी भाषा याविषयी तळटीपा आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रकाशन ...साताऱ्याचा इतिहास उलगडणाऱ्या अटकेपार’ स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २) सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ. मृदुला गर्ग, संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, पूर्वाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आहे.
मराठी साहित्य, मराठी भाषा आणि सातारा या तीन विषयांची गुंफण असलेली ही स्मरणिका अटकेपार पोहोचत संग्राह्य दस्तावेज ठरणार आहे.
Web Summary : The ‘Atakepar’ memoir, launching at a literary festival, reveals Satara's rich history, culture, and Maratha valor. It highlights Satara's significance as a Maratha capital, showcasing its heritage through articles and insights into Marathi language.
Web Summary : साहित्य महोत्सव में लॉन्च होने वाली ‘अटकेपार’ स्मारिका, सातारा के समृद्ध इतिहास, संस्कृति और मराठा वीरता को उजागर करती है। यह मराठा राजधानी के रूप में सातारा के महत्व को दर्शाती है और मराठी भाषा में अंतर्दृष्टि प्रदान करती है।